राष्ट्रीय

दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत सौम्य वाढ : दिवसभरात १३४ कोरोनाग्रस्तांची भर

backup backup
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशातील दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत सौम्य वाढ नोंदवण्यात आली आहे. बुधवारी (दि.१९) दिवसभरात १३४ कोरोनाबाधितांची भर पडली. तर १७० रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली. दरम्यान, एकाही कोरोना रूग्णाचा मृत्य़ू झालेला नाही. आज ( दि. १९) देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.८० टक्क्यांवर तर, कोरोना मृत्यूदर १.१९ टक्क्यांवर स्थिर नोंदवण्यात आला. तदैनंदिन कोरोनासंसर्गदर ०.०७% आणि आठवड्याचा कोरोनासंसर्गदर ०.०९% नोंदवण्यात आला.
देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ४ कोटी ४६ लाख ८१ हजार ५९५ पर्यंत पोहचली आहे. यातील ४ कोटी ४१ लाख ४८ हजार ८१५ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली. तर, १ हजार ९६२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दुर्दैवाने आतापर्यंत ५ लाख ३० हजार ७२८ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. दिवसभरात सक्रिय कोरोनाबाधितांच्या संख्येत ३६ ने घट नोंदवण्यात आली आहे. देशात सुरू करण्यात आलेल्या कोरोनाविरोधातील लसीकरण अभियानातून आतापर्यंत २२०.२० कोटी लावण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

हेही वाचंलत का?

SCROLL FOR NEXT