शरद पवार 
Latest

National Cancer Awareness Day : ‘कॅन्सरला हरवणारा योद्धा शरद पवार’

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आयुष्यात २००४ हे सालं समरप्रसंगासारख आलं. २००४ साली त्यांना कर्करोगाने गाठलं. त्यात २००४ हे साल निवडणुकीचं. याचवर्षी शरद पवारांच्या डाव्या गालाच्या आतल्या बाजूला गाठ आली होती. याबाबत शरद पवारांनी त्यांचे मित्र आणि डॉ. बापट यांचा सल्ला घेतला. सल्ला देताना बापट म्हणाले, 'ब्रीच कँडी'त बायोप्सी करून घेऊ. यानंतर शरद पवारांनी बायोप्सी करून घेतली. बायोप्सीच्या रिपोर्टमध्ये कर्करोगाचे निदान झाले. (National Cancer Awareness Day)

दरम्यान डॉ. बापट यांनी रिपोर्ट आल्यानंतर डॉ. प्रधान यांच्याकडे तपासणीकडे जाण्याास सांगितले. डॉ. प्रधान यांनी 'ऑपरेशन करावं लागेल', ॲडमिट व्हा, असे सांगितले. निवडणूक जवळ आली असल्याने शरद पवारांना उपचारातून मोकळं व्हायचे होते. त्यामुळे शरद पवार ऑपरेशनसाठी ताबडतोब ॲडमिट झाले. पवारांच्या डाव्या गालाचा सबंध भाग काढण्यात आला. मांडीच्या त्वचेचं तिथे रोपण करण्यात आलं. या काळात आठ जबड्याची हालचाल करायची नव्हती. जबडा मिटायचाही नव्हता. त्यामुळे टेनिस बॉलच्या आकाराचा गोळा पवारांच्या जबड्यात ठेवण्यात आला होता. National Cancer Awareness Day)

रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते प्रचार मोहिमेत गुंतले. यावेळी डॉ. बापट त्याच्यासमेवत होते. औषधउपचार आणि पथ्य काटेकोरपणानं पाळली जात आहेत का? याच्यावर डॉ. बापट यांचे हुकूमशहासारखं लक्ष्य होत. प्रचार संपल्यानंतर किमोथेरेपीचे उपचार सुरु झाले. हे उपचार अत्यंत वेदनादायी होते. पवार दिल्लीतल्या अपोलो रूग्णालयात केमो घ्यायचे. यानंतर त्यांचे सगळे दात काढून टाकण्यात आले. यानंतर त्यांना कर्करोग पसरू नये यासाठी रोज रूग्णालयात जावे लागत होते. सूक्ष्म सुईने गालाच्या आतील भाग जाळला जात होता. National Cancer Awareness Day)

शरद पवारांच्या कुटुंबीयांना, सहकाऱ्यांना त्यांचा वेदना पहावल्या जात नव्हत्या. ते म्हणायचे, "काही दिवस कामातून बाजूला होऊन आराम कर" मात्र, पवारांच्या मनाचा निग्रह पक्का होता. कामात गुंतवून घेतलं तरच आपल्या वेदना कमी होऊ शकतात.

शरद पवार लोक माझे सांगाती या त्यांच्या आत्मचरित्रात लिहितात, "मी पानपराग खायचो. तो पूर्णपणानं बंद केला. त्याचे परिणाम किती भयंकर आहेत, हे मी अनुभवलं होत; त्यामुळे तंबाखू आणि पानपराग खाऊ नका, असं मी आग्रहाने सांगू लागलो. याचा एक विधायक परिणाम महाराष्ट्रातल्या आमच्या सरकारनं तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घातली. National Cancer Awareness Day)

संकटांना न कचरता टक्कर द्यायची, या माझ्या स्वभाव वैशिष्ट्यामुळे मी कर्करोगाशी यशस्वी झुंज दिली. 'कर्करोग म्हणजे सार संपलं' अस समजून हातपाय गाळले जातात. या रोगाच्या तडाख्यात आपण सापडलो, यानेच अनेकजण गळाठून जातात. कर्करोग झाल्यानंतर माझी पहिली प्रतिक्रिया होती, याच्यावर आपल्याला मात करायची आहे, ही! आपण कर्करोगावर दोन हात करायचे आणि जिंकायचंच!

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT