पुढारी ऑनलाईन डेस्क : टांझानियामध्ये रविवारी मोठी विमान दुर्घटना घडली. प्रिसिजन हे प्रवासी विमान लँडिंग करतेवेळी व्हिक्टोरिया तलावात पडल्याची घटना समोर आली. या दुर्घटनेत ४९ लोक प्रवास असल्याची येथील स्थानिक माध्यमांनी माहिती दिली आहे. यातील २३ लोकांना वाचवण्यात यश आले आहे. त्याचबरोबर ३ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती येथील स्थनिक माध्यमांनी दिली आहे. इतर लोकांबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. (Plane Crash In Tanzania)
टांझानियाच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराब हवामानामुळे संबंधित विमान तलावात पडून ही दुर्घटना घडली. उत्तर पश्चिम भागातील बुकोबा विमानतळावर हे विमान लँडिंग करण्यात येणार होते. याच दरम्यान ही मोठी घटना घडली. सर्व प्रवाशांची बचावमोहीम चालू असल्याचे देखील माहिती पोलीसांनी दिली. (Plane Crash In Tanzania)
५ वर्षांपूर्वी देखील अशीच घटना घडली होती. या दुर्घटनेत सफारी कंपनीच्या विमानाची दुर्घटना होऊन ११ लोकांचा मृत्यू झाला होता.
हेही वाचा