India In Semi Final : भारताचा झिम्बाब्वेवर दणदणीत विजय, सेमी फायनलमध्ये दिमाखात प्रवेश
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताने झिम्बाव्बेविरुद्धच्या सामन्यात ७१ धावांनी दणदणीत विजय मिळवत टी-२० विश्वचषक स्पर्धेत सेमी फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केल्यानंतर भारताचे सेमी फायनलचे तिकिट पक्के झाले होते. तरीही भारत झिम्बाव्बेविरुद्घच्या विजय मिळवण्याच्या उद्देशानेच मैदानात उतरला. (India In Semi Final)
सूर्यकुमार यादवची दमदार खेळी आणि भारतीय गोलंदाच्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने हा विजय संपादन केला. भारताने प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वे समोर १८७ धावांचे आव्हान ठेवले होते. भारताच्या १८७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाव्बेचा संघ ११५ धावाच करू शकला. टीम इंडियाने ७१ धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. (India In Semi Final)
भारताकडून प्रथम फलंदाजी करताना सूर्यकुमार यादव आणि के.एल.राहुलने दमदार फटकेबाजी केली. सूर्यकुमार यादवने २५ चेंडूमध्ये ६१ धावा फटकावल्या तर के.एल. राहुलने ३५ चेंडूमध्ये ५१ धावांची खेळी केली. सूर्यकुमार यादव आणि के.एल. राहुल यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने झिम्बाब्वे समोर १८७ धावांचे आव्हान दिले. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संघ ११५ धावाच करू शकला. भारताकडून रविचंद्रन अश्विनने ४ षटकांमध्ये २२ देत ३ विकेट्स पटकावल्या. तर मोहम्मद शमी आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी २ विकेट्स काढल्या. (India In Semi Final)
भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेकडून रेयान बर्ल आणि रजा सिकंदर शिवाय कोणीही उभे राहु शकले नाही. रेयान बर्लने २२ चेंडूमध्ये ३५ धावा केल्या तर रजा सिकंदरने २४ चेंडूमध्ये ३४ धावा फटकावल्या. तर गोलंदाजांमध्ये शॉन विलियम्स रिचर्ड नगारवा यांना प्रत्येकी २ विकेट पटकावण्यात यश आले. (India In Semi Final)