इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
गाय आणि बैलांची वाहतूक करणाऱ्या त्रिकुटाला अडवून कसारा घाटात बेदम मारहाणप्रकरणी तसेच त्यातील एका तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या सहा संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या सर्वांना इगतपुरी न्यायालयाने १७ जुनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहापुर तालुक्यातील विहीतगाव येथुन आठ जुनला रात्री एका टेम्पोत दोन गायी, एक बैल व एक वासरू ठाणे जिल्ह्यातील पडघा येथे पप्पु अतीक पड्डी (वय ३६). अकील गुलाम गंवडी (वय २५) आणि लुकमान सुलेमान अंसारी (वय २५) हे तिघे जन घेऊन जात होते. कारेगाव येथून टाटा पिकअपमध्ये ही जनावरे घेऊन ते प्रल्हाद शंकर पगारे (विहीतगाव) यांच्या घरासमोर थांबलेले होते. यावेळी कारेगावकडून १५ ते २० जणांचा जमाव आला आणि त्यांनी हा टेम्पो अडवुन तिघांना मारहाण केली. तिघांपैकी अकील गुलाम गंवडी हा पळुन गेला. उरलेल्या दोन जणांना या जमावाने कसारा घाटातील घाटनदेवी मंदिरासमोर रात्री टेम्पोसह आणले. तेथे पुन्हा मारहाण करायला सुरुवात करताच टेम्पोतील लुकमान सुलेमान अंसारी हा जीव वाचवण्यासाठी घाटनदेवी मंदिरासमोर असलेल्या उंट दरीच्या दिशेने पळाला. परंतु अंधारात पळताना तो खोल दरीत पडून त्याचा मृत्यू झाला. १० जुन रोजी उंट दरीत लुकमान सुलेमान अंसारी याचा मृतदेह २५० फुट खोल दरीत आढळून आला. हा मृतदेह कसारा येथील आपत्ती व्यवस्थापन टीमचे शाम धुमाळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाच तासांच्या अथक परिश्रमाने बाहेर काढला. मारहाण आणि मृत्यूप्रकरणी पोलिसांनी वीस जणांवर गुन्हा दाखल केला होता.
टोळक्याने टेम्पो व जखमी अतिक हर्षद पड्डी यांना इगतपुरी पोलीसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी जखमी चालकास ग्रामीण रुगणालयात उपचारासाठी दाखल केले होते. इगतपुरी पोलिसांनी याप्रकरणी सहा संशयित आरोपी प्रदीप गोपाळ आडोळे (वय ३४, घोटी), भास्कर बाबुलाल भगत (वय २८, इगतपुरी), विजय प्रभाकर भागडे (वय २६, इगतपुरी), चेतन सोमनाथ सोनवणे (वय २६, घोटी), रुपेश रामदास जोशी (वय ३९, घोटी), शेखर रामचंद्र गायकवाड (वय २२, घोटी) यांना अटक केली. या घटनेतील अन्य संशयित आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. दरम्यान, गोवंशाची बेकायदा वाहतुकप्रकरणी पप्पु अतीक पड्डी आणि अकील गुलाम गंवडी यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला
हेही वाचा :