आजचे राशिभविष्य (१३ जून २०२३) | पुढारी

आजचे राशिभविष्य (१३ जून २०२३)

मेष ः प्रिय व्यक्तीकडून आलेल्या भेटवस्तूंमुळे आपला दिवस उत्तेजनापूर्ण असेल. नवीन व्यावसायिक भागीदारीत काही सुरू करणे टाळा.

वृषभ ः प्रिय व्यक्तीसोबत तुमचे काही मतभेद होतील. तुम्हाला काय म्हणायचे आहे ते तुमच्या प्रिय व्यक्तीला सांगण्यात अडचणी येऊ शकतात.

मिथुन ः विश्रांती घेण्यास वेळ मिळेल. प्रलंबित घटना, वादग्रस्त विषय संदेहास्पद होतील आणि खर्चामुळे तुमचे मन काळवंडून जाईल.

कर्क ः तुमच्या चपळ कृतीमुळे उत्तेजन मिळेल. यश मिळविण्यासाठी वेळकाळ पाहून संकल्पनांमध्ये बदल करा. त्यामुळे तुमचा द़ृष्टिकोन विस्तारेल.

सिंह ः अमर्याद सर्जनशीलता आणि उत्साह तुम्हाला अधिक फायदेशीर दिवसांकडे घेऊन जाईल. आर्थिक आवक चांगली होईल.

कन्या ः कुणी मदत करेल, अशी अपेक्षा बाळगू नका. मात्र, आर्थिक प्रश्न सुटतील. त्यामुळे तुम्ही चिंतामुक्त व्हाल. मनोबल उंचावेल.

तूळ ः काय चांगले आणि वाईट यामधील फरक तुम्हाला माहीत असल्याने ठामपणाने, धाडसी आणि जलद निर्णय घेऊन परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा.

वृश्चिक ः बाहेरील कामकाज दमवणूक करणारे आणि ताणतणावाचे असेल. घरातील लहान-लहान गोष्टींवर खूप धन खर्च होऊ शकते.

धनु ः इतरांच्या सूचनांप्रमाणे काम करणे महत्त्वाचे असणारा दिवस. मेहनत केलीत, तर यश निश्चित मिळेल. कारण, आजचा दिवस तुमचाच आहे.

मकर ः तुमची देण्याची वृत्ती म्हणजे अप्रत्यक्ष मदत करण्याची वृत्ती आहे. त्यामुळे शंका, निरुत्साह, मत्सर, हेवा, गर्व यापासून तुम्ही मुक्त व्हाल.

कुंभ ः मूड एकदम बहारदार राहील. तुमच्या नात्यातल्या सगळ्या तक्रारी निघून जातील. सुयोग्य कर्मचार्‍यांना नोकरीत बढती मिळेल.

मीन ः महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेताना दुसर्‍यांच्या दडपणाखाली वावरू नका. परगावी प्रवास फारसा आरामदायी नसेल.

– ज्यो. मंगेश महाडिक

Back to top button