नांदेड; विशेष प्रतिनिधी : डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील प्रसुतीशास्त्र विभागाने मागील काही महिन्यांमध्ये साधारण प्रसुतीच्या बाबतीत उल्लेखनीय कामगिरी बजावल्याचे एकीकडे सांगितले जात असताना सुखरुप प्रसुतीनंतर जन्मास आलेल्या नवजात बालकांसाठी या रुग्णालयात असलेल्या कक्षातील असुविधा, अपुरे कर्मचारी आणि गैरव्यवस्थापन यामुळे ३६ तासात १६ बालके दगावले असल्याची शक्यता शहरातील काही तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केली. (Nanded Hospital News)
३० सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान वरील रुग्णालयात दगावलेल्या रुग्णांमध्ये २४ रुग्णांमध्ये १२ बालकांचा समावेश होता. त्यानंतरच्या काही तासात आणखी ४ बालकांचा मृत्यू झाला. या सर्व बालकांच्या मृत्यूमागची रुग्णालय प्रशासनाने नोंदविलेली कारणे समोर आली आहेत. बहुतांश नवजात बालकं जंतुसंसर्ग, जन्मल्यानंतर फुफुसांवर ताण पडणे, श्वास घेण्यात अडथळा निर्माण होणे, वजन कमी असतानाही योग्य ती खबरदारी न घेणे अशा नोंदी समोर आल्यानंतर या बालकांसाठी असलेल्या कक्षामध्ये गडबड असली पाहिजे, असे मत एका ज्येष्ठ डॉक्टरांनी नोंदविले. (Nanded Hospital News)
शासकीय रुग्णालयाच्या प्रसुती विभागावर गेल्या काही वर्षांपासून मोठा ताण पडत आहे. या रुग्णालयात जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातील महिलांना प्रसुतीसाठी दाखल केले जाते. वाढत्या गर्दीमुळे बालकांच्या कक्षामध्ये क्षमतेपेक्षा जास्त बालकांना ठेवण्याचा प्रसंग रुग्णालय प्रशासनावर ओढवला. अशा परिस्थितीत जास्त स्वच्छता ठेवावी लागते. निर्जंतुकीकरणाच्या बाबतीत विशेष दक्षता घ्यावी लागते. (Nanded Hospital News)
हेही वाचा :