पुढारी ऑनलाईन डेस्क : स्टार महिला हॉकी प्लेयर आणि अनुभवी मिडफिल्डर २७ वर्षीय नमिता टोप्पोने (Namita Toppo ) गुरुवारी (दि १५ सप्टेंबर) हॉकीमधून निवृत्ती घेतली. तिने आतापर्यंत भारतासाठी १५० पेक्षा अधिक मॅच खेळल्या आहेत. नमिताने वयाच्या सतराव्या वर्षी भारतासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यास सुरुवात केली. तिने भारतासाठी अनेक महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. तिचा प्रवास हा प्रेरणादायी आहे. जाणून घेऊया नमिता टोप्पोविषयी. या स्पर्धेमध्ये तिने उत्तम कामगिरी बजावलेली आहे.
ओडीसातील सुंदरगढ जिल्ह्यातील जौरुम गावातील रहिवासी असलेली २७ वर्षीय नमिताने २०१२ मध्ये भारतीय हॉकी संघात पदार्पण केले. २०१४ आणि २०१८ आशियाई खेळांमध्ये भारतीय महिला हॉकी संघाने अनुक्रमे कांस्य आणि रजत पदकावर आपलं नाव कोरलं त्या संघाची नमिता ही सदस्य होती. या विजयात तिचा वाटा खूप मोलाच होता. टोकियो ऑलम्पिक २०२० मध्ये भारतीय महिला संघ चौथ्या स्थानावर होता. त्या संघाचीही ती सदस्य होती. तिने आपल्या खेळाच्या कारकिर्दीत तब्बल १० वर्षे ती भारतासाठी खेळली आणि हॉकी क्षेत्रात तिने आपलं एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले.
हॉकी कोच नेके शोपमैन यांनी नमिता विषयी बोलताना सांगितले की, "नमिताचे भारतीय हॉकी संघामध्ये खूप मोठे स्थान आहे. नमिता युवांसाठी एक आदर्श रोल-मॉडेल आहे. ते पुढे असेही म्हणाले की, खूप कमी लोकांना देशासाठी १६८ मॅच खेळण्याची संधी मिळते. आणि ती संधी नमिताला मिळाली होती. तिने आपल्या क्षमतेवर संघात जागा मिळवली होती. ती एक उत्तम खेळाडू आहे. त्याचबरोबर ती एक माणूस म्हणूनही छान आहे.