नागपूर; पुढारी वृत्तसेवा: अंमली पदार्थ विक्रेत्यांवर नागपूर पोलिसांची धडक कारवाई केली आहे. यादरम्यान नागपूर पोलिसांनी अवघ्या सहा तासांत तब्बल ६६ जणांना ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी १ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
नागपुरात अंमली पदार्थांची तस्करी वाढल्याने शहरातील गुन्ह्यात वाढ झालेली पाहायला मिळत असल्याने नागपूर पोलीस आयुक्तांनी कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार नागपूर शहर पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान पाच जणांना अंमली पदार्थ बाळगताना तर ६१ जणांना अंमली पदार्थ सेवन केल्यामुळे ताब्यात घेतले आहे. नागपूर पोलिसांनी अवघ्या सहा तासात ही कारवाई. यापूर्वी नागपूर पोलिसांनी क्रिकेट बुकी आणि अंमली पदार्थ विक्रेत्यांवर धडक कारवाई केली होती.
नागपूर जिल्ह्यात दुधाच्या वाहनातून प्रतिबंधित सुगंधी तंबाखूची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याचे निदर्शनास आले. यानंतर नागपूर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. याप्रकरणी नागपुरातील जरीपटका पोलिसांनी कारवाई करत वाहनासह २५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी विजय ट्रेकर्सचे संचालक विजय जेठाणीसह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नागपुरातून छत्तीसगढमध्ये सुगंधी तंबाखूची तस्करी होत असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली आहे.
हेही वाचलंत का?