नांदेड : मौजे सारखणी येथे आठवडी बाजारात मोबाईलची चोरी - पुढारी

नांदेड : मौजे सारखणी येथे आठवडी बाजारात मोबाईलची चोरी

वाई बाजार; पुढारी वृत्तसेवा : मौजे सारखणी येथे आठवडी बाजारात मोबाईल चोरी करताना दोघांना नागरिकांनी रंगेहाथ पकडले. यातील एकाला नागरीकांचा बेदम चोप दिला. तर पळालेल्या दोघांना पोलिसांनी फिल्मीस्टाईलने पकडून गुन्हा दाखल केला. यानंतर दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

अरमोज अनोखीलाल राजपूत (वय १९, रा. मांडवी ता. कळमेश्वर जि. नागपूर) आणि महेंद्रकपूर बिशूलाल काजले (वय १९, रा. पठानिया पोस्ट झडपा तालुका जिल्हा हारदा) असे अटक केलेल्याची नावे आहेत.

याबाबतची माहिती अशी की, धावपळीची व गजबजलेली बाजारपेठ म्हणून प्रचंलित असलेल्या मौजे सारखणी येथील आठवडी बाजारात सोमवारी ( दि. २५ ) रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास सलीम अजीजभाई फाजलानी यांचा रेडमी वाय थ्री कंपनीचा मोबाईल चोरट्यांनी लांबवला. तर याच दरम्यान देविदास दुधराम राठोड (रा. मुंगशी, ह. मु. सारखणी) हे तुळजाई कृषी सेवा केंद्राच्या समोर आठवडी बाजारात भाजी खरेदीसाठी खाली वाकले असता त्यांच्या शर्टच्या खिशात असलेल्या मोबाईल चोरट्यानी शिताफिने लंपास केला.

देवीदास यांचाही मोबाईल लंपास केल्यानंतर चार- पाच पावलांवर असलेल्या चोरट्यांच्या इतर दोन साथीदारांकडे तोच मोबाईल देत असल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी आरडाओरडा केली. आणि यातील एकाला नागरीकांनी पकडून बेदम चोप देवून पोलिसांच्या ताब्यात दिले.

तर इतर दोघे चोरटे घटनास्थळावरून माहूरच्या दिशेने पसार झाले. दरम्यान रस्त्यावरून जात असताना चोरटे खासगी वाहनाने प्रवास करण्याची शक्यता असल्याचा अंदाज आल्याने तशा सुचना सिंदखेड पोलिसांना दिल्या.

यामाहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरिक्षक भालचंद्र तिडके यांच्यासह हे. काँ. पठाण व पो. काँ. गजानन नंदगावे यांच्या पथकाने सदर चोरट्यांचा फिल्मीस्टाईल पाठलाग करून अरमोज राजपूत आणि महेंद्रकपूर काजले दोघांना माहूर बसस्थानकाजवळ पकडले.

या प्रकरणी सलीम अजीजभाई फाजलानी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिंदखेड पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीना माहूरच्या प्रथमवर्ग न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button