अरविंद केजरीवाल (संग्रहित छायाचित्र ) 
Latest

Motion of Confidence: मुख्यमंत्री केजरीवाल उद्या विधानसभेत ‘विश्वासदर्शक’ ठराव मांडणार

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडणार असल्याचे आज (दि.१६) विधानसभेत बोलताना स्पष्ट केले. यानंतर विधानसभा सभागृह कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले आहे. उद्या सभागृहाचे कामकाज नियमितपणे होणार असून, यावेळी हा प्रस्ताव चर्चेसाठी मांडला जाणार असल्याचे देखील केजरीवाल यांनी म्हटले आहे. (Motion of Confidence)

आमच्या एकाही आमदाराने पक्षांतर केले नाही- मुख्यमंत्री केजरीवाल

दिल्लीतील आम आदमी पक्षाचे (आप) सरकार पुन्हा एकदा विधानसभेत आपले बहुमत दाखवणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी (दि.१६) सभागृहात विश्वासदर्शक ठराव घेणार असल्याचे सांगितले. दरम्यान केजरीवाल यांनी विधानसभेत बोलताना पुन्हा एकदा भाजपवर विधानसभेत 'ऑपरेशन लोटस' चालवल्याचा आरोप केला. तसेच आपल्या पक्षाचे सात आमदार विकत घेण्याचा प्रयत्न भाजपने केला असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे आमच्या पक्षाचा एकाही आमदाराने पक्षांतर केले नाही हे जनतेला दाखवायचे आहे, म्हणूनच हा विश्वासदर्शक ठराव मांडत असल्याचेही केजरीवाल म्हणाले. (Motion of Confidence)

….त्यांना आमचे सरकार पाडायचे आहे- केजरीवालांचा आरोप

आज दिल्ली विधानसभेत बोलताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, "आम्ही पाहू शकतो की पक्ष फोडले जात आहेत आणि खोटे खटले टाकून इतर राज्यांत सरकार पाडले जात आहे. दिल्लीत, दारू धोरण प्रकरणाच्या बहाण्याने 'आप'च्या नेत्यांना अटक करण्याचा त्यांचा इरादा आहे. त्यांना सरकार पाडायचे आहे. दिल्ली सरकारला माहित आहे की, ते दिल्लीत कधीही निवडणूक जिंकू शकत नाहीत. आमचा एकही आमदार तुटलेला नाही आणि ते सर्व अबाधित आहेत हे लोकांना दाखवण्यासाठी मी विश्वासदर्शक ठराव मांडत असल्याचे आप प्रवर्तक आणि दिल्ली मुख्यमंत्री केजरीवाल यांनी म्हटले आहे. (Motion of Confidence)

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT