Latest

 Mother’s Day Google Doodle 2022 : आईपणं सांगणारं गुगलचं डुडल

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज जगभरात मातृदिन सााजरा केला जात आहे. आज प्रत्येकजण आपल्या आईला तिने आपल्याला दिलेलं ममत्व या प्रती व्यक्त होत असतो. कोणी खास शुभेच्छा देते, कोणी तिला गिफ्ट देते अस एक ना अनेक पध्दतीने तिच्या प्रती आदर व्यक्त करत असतात. आज गुगलनेही  मातृदिनानिमित्त खास अलं गुगल डुडल करुन समस्त आईवर्गाला खा, अशा शुभेच्छा दिल्या आहेत.  ( Mother's Day Google Doodle 2022) केले आहे.

 Mother's Day Google Doodle 2022 :  चार स्लाइड्ससह खास जीआयएफ

जगभरात आज मातृदिन साजरा केला जातो. मे महिन्याचा दूसरा रविवार मातृदिन साजरा केला जातो. आज ८ रोजी म्हणजेच आज आहे हा दिन आहे. यानिमीत्त गुगलने खास डुडल (Mother's Day Google Doodle 2022 )केल आहे. या डुडलमध्ये गुगलने चार स्लाइड्ससह खास जीआयएफ (Gif)  डूडल तयार केलं आहे. या डूडल पहिल्या स्लाइडमध्ये एक बाळाचा हात आणि एक आईचा हात दाखवला आहे. मुलाने आईचे बोट धरलेलं आहे. दुसऱ्या स्लाईडमध्ये आई मुलाला ब्रेल लिपी शिकवताना दाखवलं आहे. तिसऱ्या स्लाइडमध्ये    मुलाला  आई  नळाच्या पाण्याखाली हात धुवायला शिकवत आहे. तर शेवट्या चौथ्या स्लाईडमध्ये आई आणि मूल वृक्षारोपण करताना दिसत आहे.  लावताना दिसत आहे.

पहिला मातृदिन 

१९०५ साली अमेरिकेमध्ये पहिला मातृदिन साजरा केला. अ‍ॅना जार्विस या महिलेनं आपल्या आईच्या निधनानंतर मातृदिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तेव्हापासून हा दिन साजरा केला जातो.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT