

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जवर 6 विकेट्सने विजय मिळवल्याने मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई संघ आयपीएल 2022 मधून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला आहे. (mumbai indians)
मुंबईने आतापर्यंत खेळलेल्या 10 पैकी 2 सामने जिंकले असून गुणतालिकेत ते 10व्या स्थानावर आहे. मुंबईने उर्वरित 4 सामने जिंकले तर 12 गुणांपर्यंतच मजल मारता येईल. त्याच वेळी, त्याचा नेट रन रेट देखील -0.725 आहे. या विजयासह राजस्थान रॉयल्स 14 गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. गुजरात टायटन्स पहिल्या तर लखनऊ सुपर जायंट्स दुसऱ्या स्थानावर आहे. (mumbai indians)
आयपीएलचा 15 वा हंगाम मुंबई इंडियन्ससाठी अत्यंत निराशाजनक ठरला आहे. संघाला एक-दोन नव्हे तर सलग 8 पराभवांना सामोरे जावे लागले. मात्र, त्यानंतर मुंबईने सलग दोन सामने जिंकले. 5 वेळा चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्सच्या बाहेर पडल्याने चाहते खूपच निराश झाले आहेत. (mumbai indians)
मुंबईने यंदा रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि किरॉन पोलार्ड यांना कायम ठेवले, तर इशान किशनवर मेगा लिलावात तब्बल 15.25 कोटी रुपये खर्च केले. मात्र या सर्व खेळाडूंनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही, त्यामुळे मुंबईची ही अवस्था झाली. मुंबई प्लेऑफला मुकण्याचे हे सलग दुसरे वर्ष आहे. 2021 मध्ये संघ 5 व्या स्थानावर होता. त्यावेळी कमी धावगतीमुळे संघाला प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आले नव्हते.