Latest

Money Heist 5 : नेटफ्लिक्सवर आज रिलीज होणार शेवटचा भाग

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

नेटफ्लिक्सची प्रसिध्द थ्रीलर वेब सीरीज 'मनी हाएस्ट' (Money Heist 5) पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करायला तयार आहे. नेटफ्लिक्सचा पाचवा आणि शेवटच्या सीझन सीजनचा अखेरचा भाग आज रिलीज होतोय. (Money Heist 5) दीर्घकाळ प्रतीक्षेनंतर आता समजेल की, प्रोफेसर आणि त्याच्या टीमच काय झालं? बॅक ऑफ स्पेन मधून सोनं चोरण्यास ते यशस्वी ठरसे की स्पेशल फोर्सचा निशाणा बनले. या सर्व प्रश्नांची उत्तरे आज मिळणार आहेत.

केव्हा व कसे पाहू शकता मनी हाएस्ट?

नेटफ्लिक्सवर दुपारी दीड वाजता मनी हाएस्ट रिलीज होणार आहे. मनी हाएस्टचा शेवटचा भाग दोन विभागात आहे. पहिल्या भागात ५ एपिसोड्स होते. शेवटच्या भागात पाच एपिसोड्स आहेत. पहिला भाग ३ सप्टेंबरला नेटफ्लिक्सवरचं रिलीज झाला होता. आता प्रोफेसर आणि त्याच्या टीमचे सदस्य बँक ऑफ स्पेनमध्ये असलेले दिसणार आहेत. मागील सीझनमध्ये प्रेक्षकांची उत्सुकता वाढली होती. प्रोफेसरची टीम काय करत आहे आणि प्रोफेसर, एलिसिया यांच्या संघर्षाचा शेवट होणार का? आता आजच्या एपिसोडमुळे सर्वकाही स्पष्ट होणार आहे.

मनी हाएस्ट एक स्पॅनिश भाषेतील वेब सीरीज आहे. या पाचव्या भागात उर्सुला कोरबेरो, अल्वारो मोर्टे, इट्जियार इटुनो, पेड्रो अलोंसो, मिगुएल हेरान, जॅम लोरेंटे, एस्तेर एसबो, एनरिक एर्स, डार्को पेरिक, होविक केचकेरियन असे कलाकार असतील.

मनी हाएस्टचे एपिसोड याप्रकारे आहेत-

एपिसोड 1- द एंड ऑफ द रोड (The End Of The Road)
एपिसोड 2- डू यू बिलीव्ह इन रीइनकारनेशन? (Do You Believe In Reincarnation?)
एपिसोड 3- वेलकम टू द शो ऑफ लाईफ (Welcome To The Show Of Life)
एपिसोड 4- योर प्लेस इन हेवन (Your Place In Heaven)
एपिसोड 5- लिव्ह मॅनी लाईव्ह्स (Live Many Lives)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT