जळगाव अपघात : आयशरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; दोन जण गंभीर जखमी - पुढारी

जळगाव अपघात : आयशरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; दोन जण गंभीर जखमी

जळगाव ; पुढारी वृत्‍तसेवा

धरणगाव तालुक्यातील लोणे गावाजवळ भरधाव आयशरने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला, तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात आज (शुक्रवार) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. ट्रक चालकाला नागरिकांनी चोप देवून पोलिसांच्या ताब्यात दिले.

याबाबत माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील लोणी फाटा गावाजवळून भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशर क्रमांक एमएच १९ झेड ३२४३ ने समोरून येणाऱ्या दुचाकी क्रमांक एमएच १९ डीपी ८६०२ ला ट्रीपल सीट जात असताना जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. तर सोबत असलेले अन्य दोन जण गंभीर जखमी झाले.

जखमींना तातडीन धरणगाव ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर मृताचा मृतदेह ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आला आहे. दरम्यान मृताचे नाव अद्याप स्पष्ट झालेले नाही. अपघात घडल्यानंतर नागरिकांनी पळून जात असलेल्या आयशर चालकाला पकडून चांगलाच चोप दिला. यानंतर त्‍याला धरणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Back to top button