Latest

Mississippi Tornado : अमेरिकेतील मिसिसिपी राज्याला चक्रीवादळाचा तडाखा; 25 जणांचा मृत्यू

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेच्या दक्षिण-पूर्वेकडील मिसिसिपी राज्यामध्ये शुक्रवारी आलेल्या भीषण चक्रीवादळामुळे 25 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या चक्रीवादळाचा सिल्व्हर सिटी, रोलिंग फोर्क या शहरांसह 160 किलोमीटर पेक्षा अधिक क्षेत्राला फटका बसला असल्याचे राज्याच्या आपत्कालीन व्यवस्थापन एजन्सीने सांगितले.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, पश्चिम मिसिसिपीमधील 200 लोकसंख्या असलेले सिल्व्हर सिटीला चक्रीवादळाने उद्ध्वस्त केले आहे. चक्रीवादळातील मृतांची नावे, पत्ते आणि वय अद्याप समजू शकलेले नाही. गव्हर्नर टेट रीव्ह्स यांनी ट्विटरवर सांगितले की, चक्रीवादळ आणि वादळामुळे प्रभावित झालेल्या लोकांसाठी अधिक रुग्णवाहिका आणि इतर आपत्कालीन सेवा वाढविण्यात येत आहेत. यासोबतच मदत आणि बचावकार्य सुरू आहे. मिसिसिपी आपत्कालीन व्यवस्थापन एजन्सीने शनिवारी ट्विटरवर सांगितले की, 24 मार्च रोजी उशिरा आलेल्या चक्रीवादळामुळे मिसिसिपीमधील रोलिंग फोर्क शहराला तडाखा बसला आहे. चक्रीवादळामुळे सुमारे २३ लोकांचा मृत्यू झाला. तर सुमारे १२ जण जखमी असून चौघेजण बेपत्ता आहेत.

तर Mississippi Emergency Management Agency ने दिलेल्या अद्यतन माहितीनुसार मृतांचा आकडा हा 25 जणांपर्यंत पोहोचला आहे. अजूनही हा आकडा वाढू शकतो.

मिसिसिपीमधील चक्रीवादळाने एका तासापेक्षा जास्त काळ विनाशाचा मार्ग कोरल्यानंतर, डझनभर जखमी आणि संपूर्ण ब्लॉक्स धाराशाही झाल्यानंतर शेकडो बेघर झाले.

रोलिंग फोर्कच्या मिसिसिपी डेल्टा शहरात, चक्रीवादळाने पाण्याचा टॉवर पाडला. शुक्रवारी रात्रीच्या वादळाच्या वेळी रहिवाशांनी बाथटब आणि हॉलवेजमध्ये घुटमळले आणि नंतर जॉन डीअर स्टोअरमध्ये घुसले जे त्यांनी जखमींसाठी ट्रायज सेंटरमध्ये रूपांतरित केले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT