Afghanistan : अफगाणिस्तानात मोठा पूर; तीघांचा मृत्यू, 7 जखमी, 700 पेक्षा जास्त घर नष्ट | पुढारी

Afghanistan : अफगाणिस्तानात मोठा पूर; तीघांचा मृत्यू, 7 जखमी, 700 पेक्षा जास्त घर नष्ट

पुढारी ऑनलाइन डेस्क : Afghanistan : अफगाणिस्तानात गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेला प्रचंड पाऊस व नंतर आलेल्या पूरात तीन पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 7 जण जखमी झाले आहेत. तर देशातील नऊ प्रांतांमधील 756 पेक्षा जास्त घर पूर्णपणे किंवा आंशिक नष्ट झाले आहे.

Afghanistan : अफगाणिस्तानच्या स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या पूरात बल्ख, जाबुल, फरयाब, उरुजगन, निमरोज, नांगरहार, कुनार, नूरिस्तान आणि लगमन हे प्रांत पावसामुळे प्रभावित झाले आहे. खामा प्रेसने अलीकडेच NDMA चा हवाला देऊन वृत्त दिले आहे की, अफगाणिस्तानमध्ये अचानक आलेल्या पूर आणि भूकंपामुळे किमान दहा लोक ठार आणि 60 हून अधिक जखमी झाले आहेत.

आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रवक्ते सहफिहुल्ला रहीमी यांनी देशातील अलीकडील नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या मृत्यू आणि जखमींच्या संख्येबद्दल नवीनतम अद्यतने जाहीर केली. नैसर्गिक आपत्तींमुळे मनुष्यहानी व वित्तहानी झाली आहे. त्यामुळे 700 हून अधिक घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. तसेच, देशभरात अचानक आलेल्या पुरामुळे 100 हून अधिक घरे उद्ध्वस्त झाली आहेत.
त्यांनी सांगितले की, बाधित कुटुंबांना अन्न, तंबू, ब्लँकेट इत्यादी जीवनावश्यक वस्तू पुरविण्यात आल्या आहेत. तसेच, लवकरच एक पथक Afghanistan बाधित भागाचे सर्वेक्षण करणार आहे.

हे ही वाचा :

Tejashwi Yadav : ‘फक्त गुजराती लोकच गुंड’, राहुल गांधींनंतर तेजस्वी यादव यांना वादग्रस्त वक्तव्य भोवणार!

बंगळूर : डबल इंजिन सरकारमुळे राज्याचा विकास : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Back to top button