Pro-Khalistani : खलिस्तान समर्थकांकडून वॉशिंग्टन दूतावासाबाहेर भारतीय पत्रकारावर हल्ला | पुढारी

Pro-Khalistani : खलिस्तान समर्थकांकडून वॉशिंग्टन दूतावासाबाहेर भारतीय पत्रकारावर हल्ला

पुढारी ऑनलाइन डेस्क : अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथे भारतीय दूतावासाबाहेर Pro-Khalistani खलिस्तान समर्थकांनी शनिवारी निदर्शने केली. यावेळी तिथे उपस्थित भारतीय पत्रकारावर काही निदर्शकांनी हल्ला केला. लाठीने मारहाण करून त्याला शिवीगाळ केली. मात्र, वेळीच तिथे पोहोचलेल्या पोलिसांनी त्याला वाचवले. यासाठी या पत्रकाराने पोलिसांचे आभार मानले. ‘ललित झा’ असे या पत्रकाराचे नाव आहे.

ललित झा याने रविवारी ट्विटर वर व्हिडिओ पोस्ट करून याची माहिती दिली आणि यूएस सीक्रेट सर्व्हिसचे त्याचे संरक्षण केल्याबद्दल आणि त्यांचे काम करण्यासाठी मदत केल्याबद्दल आभार मानले. Pro-Khalistani खलिस्तान समर्थकांनी त्याच्या डाव्या कानावर दोन लाठी मारल्या, असे त्याने सांगितले.

Pro-Khalistani खलिस्तान समर्थकाने माझ्या डाव्या कानावर लाठीमार केला

झा याने त्याच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, दोन दिवस माझे रक्षण केल्याबद्दल धन्यवाद @SecretService. अन्यथा मला हे हॉस्पिटलमधून लिहावे लागले असते. व्हिडिओत दिसत असलेल्या या खलिस्तान समर्थकाने माझ्या डाव्या कानावर 2 काठ्या मारल्या. त्यापूर्वी मला 9/11 ला कॉल करावा लागला आणि दोन पोलिस व्हॅन माझ्यावरील हल्ल्याच्या भीतीने माझ्या सुरक्षेसाठी धावून आल्या.

एका क्षणी तर मला इतका धोका वाटला की मी 911 वर कॉल केला. त्यानंतर मी सीक्रेट सर्व्हिस अधिका-यांना पाहिले आणि त्यांना घडलेला प्रकार सांगितला, असे झा यांनी ANI ला दिलेल्या माहितीत सांगितले. निदर्शकांनी परिस्थितीची जबाबदारी घेतली. मात्र, पत्रकाराने त्याच्यावर हल्ला करणा-यांवर कोणतीही कारवाई न करण्याचा निर्णय घेतला.

Pro-Khalistani दूतावासाची तोडफोड करण्याची धमकी

झा यांनी सांगितले, “अमृतपालच्या समर्थनार्थ खलिस्तान समर्थक निदर्शकांनी खलिस्तानचे झेंडे फडकावले आणि यूएस सीक्रेट सर्व्हिसच्या उपस्थितीत दूतावासावर उतरले. त्यांनी अगदी उघडपणे दूतावासाची तोडफोड करण्याची धमकी दिली आणि भारतीय राजदूत तरनजीत सिंग संधू यांना धमकी दिली.”

निदर्शकांमध्ये खलिस्तान समर्थक घोषणा देणार्‍या सर्व वयोगटातील पगडीधारी पुरुषांचा समावेश होता. ते DC-Maryland-Virginia (DMV) क्षेत्राच्या वेगवेगळ्या भागातून आले होते. आयोजकांनी इंग्लिश आणि पंजाबी या दोन्ही भाषांमध्ये भारतविरोधी भाषणे करण्यासाठी माइकचा वापर केला आणि मानवी हक्कांच्या उल्लंघनासाठी पंजाब पोलिसांना लक्ष्य केले.

भारतीय दूतावास आणि सॅन फ्रान्सिस्को वाणिज्य दूतावासाबाहेर खलिस्तानच्या समर्थकांकडून निदर्शने करण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला 20 मार्च रोजी सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय वाणिज्य दूतावासावरही हल्ला झाला होता.

हे ही वाचा :

Khalistanists : लंडनमधील खलिस्तान समर्थकांवर गुन्हे दाखल

Transgender Salon : मुंबईत ट्रान्सजेंडर लोकांसाठी चालवले जाणारे पहिले सलून सुरू

Back to top button