Latest

मंत्री जितेंद्र आव्हाडांनी कार्यकर्त्याने केलेला नवस फेडला !

अमृता चौगुले

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड सध्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील फैजपूर येथे हजरत बाबा दुलदुल शहा वली यांच्या दर्ग्यावर चादर चढवून कार्यकर्त्यांने केलेला नवस फेडला. सध्या त्यांच्या दौऱ्यावर त्यांनी फेडलेल्या नवसाचीच चर्चा होत आहे.

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांची सर्वसामान्यांचे नेते अशी ओळख आहे. नेहमी त्यांना कार्यकर्त्यांच्या गोतावळ्यातच पाहले जाते. त्यांचे आपल्या कार्यकर्त्यांशी जवळीकीचे व आपुलकीचे नाते आहे. याचीच प्रचिती ते जळगाव दौऱ्यावर असताना पुन्हा आली. फैजपूर येथील हजरत बाबा दुलदुल शहा वली यांचा दर्गा सर्वच धर्मीयांच्यासाठी अत्यंत आदराचे व श्रद्धेचे स्थान आहे. आव्हाड यांच्या एका कार्यकर्त्याने याच हजरत बाबा दुलदुल शहा वली यांच्याकडे नवस बोलला होता.

जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना आव्हाड यांनी या हजरत बाबा दुलदुल शहा वली यांच्या दर्गास भेट देऊन चादर चढवली आणि कार्यकर्त्यांने बोललेला नवस फेडला. यामुळे पुन्हा एकदा त्यांचे कार्यकर्त्यांशी असलेल्या नात्यांची चर्चा होऊ लागली आहे.

याप्रसंगी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, ओबीसींनी बाहेर पडून त्यांची लढाई स्वतः लढावी, विना आरक्षणाने एकही ओबीसी निवडून येणार नसल्याची प्रतिक्रिया देत भाजपमुळे ओबीसी आरक्षण गेले असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केले. तसेच त्यांनी महागाईविरोधात केंद्र सरकारवरही टीकास्त्र सोडले.

मध्य प्रदेशात सर्वात स्वस्त दारू विकली जाते. मात्र टीका महाराष्ट्र सरकारवर केली जाते. हा प्रकार म्हणजे काहीही करून महाविकास आघाडीला बदनाम करण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी उपस्थित होते मात्र राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी या कार्यक्रमाला पाठ फिरवल्याने राजकीय वर्तुळात मात्र चर्चेला उधाण आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT