सिन्नर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कडवा योजनेची जलवाहिनी पुन्हा फुटली | पुढारी

सिन्नर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कडवा योजनेची जलवाहिनी पुन्हा फुटली

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा : सिन्नर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कडवा धरणातून राबविण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन शुक्रवारी (दि.१) आगासखिंड शिवारात फुटली. ऐन टंचाईच्या काळात पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असले तरी शहराला दोन-तीन दिवस पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे.

आगासखिंड शिवारात जलवाहिनीला तडा गेला असून दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर सुरु करण्यात आले आहे. शनिवारी (दि.२) दुपारपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण होईल. त्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी पाणी जपून वापरावे. पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन मुख्याधिकारी संजय केदार यांनी केले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button