Meta's social media 
Latest

Meta’s social media : फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्स अ‍ॅप डाऊन, हजारो युजर्संनी वाचला तक्रारीचा पाढा

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : मेटाची मालकी असलेले  फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप डाऊन झाल्याने हजारो युजर्सनी तक्रार केली आहे. जगभरातील अनेक वापरकर्त्यांना फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप वापर करताना अडचणी येत आहेत. युजर्स ट्विटरवर ट्विट करत आपला राग व्यक्त करत आहेत. मेटाने याबाबत अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. (Meta's social media)

बहुतांश सोशल मीडिया युजर्सच्या मोबाईमध्ये  'मेटा'चे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप ही अ‍ॅप्लिकेशन असतात. डाऊनडिटेक्टरच्या रिपोर्टनुसार मेटा प्लॅटफॉर्मच्या सोशल मीडिया असलेल्या इंस्टाग्राम आणि फेसबुक आणि मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपवरील वापरकर्त्यांनी सोमवारी (दि.१०) तक्रारी नोंदवल्या. इंस्टाग्रामवरील सुमारे १३,००० युजर्सना इन्स्टाग्राम हाताळताना अडचणी आल्या आहेत. फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर अनुक्रमे ५,४०० आणि १,८७० युजर्सना अडचणी आल्या आहेत.

युजर्सना आलेल्या अडचणी संदर्भात मेटाने अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

Meta's social media : युजर्स ट्विटरवर संताप व्यक्त करत आहेत

फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप युजर्स आपलेल्या अडचणी संदर्भात ट्विटरवर व्यक्त होत आहेत. ट्विटरवर #Facebook , #Instagram , #WhatsApp , #FacebookDown असे हॅशटॅग ट्रेंडींगमध्ये आहेत.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT