...मग मतदार डोळे मिटायला मोकळे ! सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस | पुढारी

...मग मतदार डोळे मिटायला मोकळे ! सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

पुणे; पुढारी वृत्तसेवा : अजित पवार यांनी काही आमदारांसह मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस सुरू झाला. व्हॉट्सअप, फेसबुक, टि्वटर सोबतच अन्य सोशल मीडियावर काही आक्रमक, तर काही संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, शरद पवार यांच्यासोबतच सर्वच राजकीय हालचालींवर नेटकरी व्यक्त होत आहेत.

आम्ही विश्वासाने एका पक्षाला मतदान करतो; परंतु आमच्या मताला कुठेही किंमत राहत नाही. सत्तेसाठी राजकारण कुठल्याही पातळीपर्यंत जाऊ शकते. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मताला किंमत राहिली नाही हे सिद्ध होत आहे. आता हे दोघेच (नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी) उरलेत. हे एकत्र आले की आपण मतदार डोळे मिटायला मोकळे..! अशी एक प्रतिक्रिया आहे. अण्णा हजारे यांचा फोटो वापरून कोणाविरुद्ध उपोषण करावं तेच कळत नाहीये..! आज पुणेकर पुन्हा चिडले.. अरे, तुम्ही आमच्या झोपेच्या वेळेतच शपथविधी का करता नेहमी? ‘सासूसाठी वेगळे राहिले आणि सासूच वाटणीला आली…अशाही प्रतिक्रिया आहेत.

जुने व्हिडिओ व्हायरल…

सोशल मीडियावर जुने व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘कदापि राष्ट्रवादीसोबत जाणार नाही. एक वेळ अविवाहित राहू पण राष्ट्रवादीसोबत जाणार नाही’, असे म्हणाले होते. तीच आठवण आज करून दिली जात आहे. कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचा एक जुना व्हिडिओही व्हायरल झाला आहे. त्यात ते म्हणतात, ‘कार्यकर्त्यांवर लई वाईट दिवस आले. आपण ज्यांचे भोंगे बांधले तेच गेले दुसर्‍या पक्षात…

Back to top button