Latest

Mercedes Benz Electric Car : मर्सिडीजची ‘ही’ इलेक्ट्रिक कार चालू असतानाच होते चार्ज!

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय कार चाहत्यांसाठी मोठी खुशखबर आहे. लक्झरीयस कार उत्पादन करणारी मर्सिडिज कंपनी बाजार पेठेत नवी कार (Mercedes Benz Electric Car) लॉन्च करणार आहेत. Mercedes Benz Vision EQXX असे या कारचे नाव आहे. बऱ्याच दिवसांपासून या कारची चाहते वाट पाहत होते. विशेष म्हणजे ही कार 1000 किलोमीटर पेक्षाही अधिक अंतर पार करणारी असेल.

Mercedes Benz Electric Car : ग्लोबल प्रिमिअरच्या दरम्यान लॉन्च

ग्लोबल प्रिमिअर दरम्यान ही कार भारतात दाखवण्यात आली. म्हणजेच ही कार लवकरच भारतात लॉन्च होईल असा अंदाज वर्तविला जात आहे. ही कार भविष्यातील नव्या तांत्रिक बदलांनी सुसज्ज आहे. आकर्षक डिझाईन आणि तंत्रज्ञान यात पहायला मिळेल. एअरडायनामिकच्या कारणास्तव बॅटरी ईफिशियंसीचे प्रमाण जास्त प्रमाण पहायला मिळते. यामुळे ९५ टक्के ऊर्जेची बचत होते.

कार मध्ये सोलर पॅनलची व्यवस्था

मर्सिडिज कंपनीने या नव्या कारमध्ये 100 KW इतक्या ताकदवान बॅटरीचा वापर केलेला आहे. एकदा चार्ज केल्यानंतर ही कार 1200 किलोमीटर पर्यंतचे मायलेज देईल असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. कारमधील इलेक्ट्रीक मोटर 245 Bhp इतकी पॉवर जनरेट करते. या कारची एक खासियत आहे की, कारच्या छतावर सोलर पॅनल बसवले असल्याने ही कार चालू असतानाही चार्ज होते. त्यामुळे आपसुकच विजेची बचत होते.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT