mastercard file photo 
Latest

mastercard ला आरबीआयचा मोठा दणका! जुन्या ग्राहकांचे काय होणार?

backup backup

नवी दिल्ली ; पुढारी ऑनलाईन : स्थानिक डेटा स्टोरेजच्या नियमांवरून आरबीआयचा पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर्ससोबत बराच काळ वाद सुरू होता. या लढतीत mastercard ला बुधवारी मोठा धक्का बसला आहे. mastercard वर मोठी कारवाई करत आरबीआयने सर्विस प्रोव्हायडर्सना भारतात नवीन ग्राहक जोडण्यास बंदी घातली आहे. कंपनीने स्थानिक डेटा साठवणुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार मास्टरकार्ड एशिया पॅसिफिक लिमिटेडची २२ जुलै २०२१ पासून डेबिट, क्रेडिट किंवा प्रीपेड कार्डचे नवीन देशांतर्गत ग्राहक घेण्यास बंदी घातली आहे.

आरबीआयचा मोठा दणका युपीआयकडून चिंता

आरबीआयच्या निर्णयाने भारतातील मास्टरकार्डला मोठा धक्का मानला जात आहे. मास्टरकार्डचे भारतीय बाजारपेठेत मोठा वाटा आहे.

अधिक वाचा : 

लंडनमधील पेमेंट स्टार्टअप कंपनी पीपीआरओच्या माहितीनुसार गेल्या वर्षी भारतात एकूण कार्ड पेमेंटपैकी एकट्या मास्टरकार्डचा वाटा होता.

जागतिक पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर्स भारतातील यूपीआय व्यवहारांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे चिंतेत आहेत.

कार्डलेस आणि कॅशलेस पेमेंट सुविधांनी लोकांचा विश्वास जिंकला आहे.

दरम्यान लोकांनी या माध्यमाचा मोठ्या प्रमाणात वापर केला आहे. भारतात जून महिन्यात २.८ अब्ज यूपीआय व्यवहार झाले, ज्यात सुमारे ५.५ ट्रिलियन रुपयांचे व्यवहार झाले.

अधिक वाचा : 

जुन्या ग्राहकांवर परिणाम होईल का?

दरम्यान, मास्टरकार्डच्या जुन्या ग्राहकांवर अजिबात परिणाम होणार नसल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

मास्टरकार्डचा वापर करणार्‍या बँका आणि बिगर बँकांना मास्टरकार्डने दिलेल्या मार्गदर्शक सूचना पाळाव्या लागतील.

या आदेशानंतर, मास्टरकार्ड २२ जुलै २०२१ पासून नवीन कार्ड जारी करण्यास सक्षम राहणार नाही. पण जुन्या ग्राहकांना सेवा देत राहतील.

2018 च्या परिपत्रकाचे उल्लंघन केल्याचा परिणाम

आरबीआयच्या म्हणण्यानुसार, पेमेंट सिस्टमची डेटा देखभाल करण्याबाबत ६ एप्रिल २०१८ रोजी एक परिपत्रक जारी केले होते.
याअंतर्गत, सर्व संबंधित सेवा प्रोव्हायडर्सना हे सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

सहा महिन्यांच्या आत संबंधित सर्व डेटा भारतात ठेवण्याचे आदेश आरबीआयने जारी केले होते. तसेच, आरबीआयला त्याचे पालन करण्याविषयी माहिती द्यावी लागली. परंतु आरबीआयच्या माहितीनुसार मास्टरकार्ड कंपनीने अद्याप देशात हा नियम पाळलेला नाही.

मास्टरकार्डवरील बंदीची घोषणा करताना रिझर्व्ह बँक म्हणाली, कंपनीला पुरेसा वेळ आणि संधी दिल्यानंतरही पेमेंट सिस्टम डेटाच्या देखभालीबाबतच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात मास्टकार्ड पूकर्णपणे अपयशी ठरले आहे.

अधिक वाचा : 

केंद्रीय बँकेने यापूर्वी अमेरिकन एक्सप्रेस बँकिंग कॉर्प आणि डिनर्स क्लब इंटरनॅशनल लिमिटेडलाही आपल्या कार्ड नेटवर्कमध्ये नवीन

देशांतर्गत ग्राहक जोडण्यास बंदी घातली होती.

डेटा साठवणुकीशी संबंधित निकषांचे उल्लंघन केल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला.

मास्टरकार्ड, व्हिसा आणि अमेरिकन एक्सप्रेसने सर्व डेटा स्टोरेज नियमांना विरोध केला आहे.

mastercard ने या बंदीवर काय म्हटले आहे?

मास्टरकार्डने एका निवेदनात म्हटले आहे की, कंपनी कायद्याचे आणि नियामक जबाबदाऱ्यांचे पालन करण्यास पूर्णपणे वचनबद्ध आहे.

पेमेंट ट्रान्झॅक्शन डेटा कलेक्शनची आवश्यकता असल्याचे २०२१ मध्ये आरबीआयने जारी केल्यापासून, आम्ही सतत आमच्या प्रक्रिया आणि अनुपालनाविषयी माहिती आणि अहवाल प्रदान केला आहे.

आरबीआयच्या भूमिकेविषयी निराश असलो तरी, त्यांच्या चिंता सोडविण्यासाठी आवश्यक त्या प्रमाणात तपशील प्रदान करण्यासाठी आम्ही त्यांच्याबरोबर काम करत राहू.

हे ही वाचा :

हे ही पाहा 

[visual_portfolio id="8490"]

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT