hruta durgule -prateek shah  
Latest

Hruta Durgule love story : हृता दुर्गुळेचा पती प्रतिक शाह आहे तरी कोण?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

फुलपाखरू, मन उडू उडू झालं या मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडणारी हृता दुर्गुळे (Hruta Durgule love story) विवाहबंधनात अडकली. तिने तिचा बॉयफ्रेंड प्रतिक शाहसोबत संसाराची गाठ बांधलीय. तुम्हाला माहितीये का, हृता दुर्गुळेचा पती प्रतिक शाह कोण आहे? (Hruta Durgule love story)

मन उडू उडू झालं या मालिकेत हृताने उत्तम भूमिका साकारलीय. अभिनेत्री हृता बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर सक्रिय आहे. ती तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. कालदेखील संध्याकाळी तिने काही खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस पडतोय. तिने प्रतिक शाहसोबत विवाहगाठ बांधल्यानंतर फोटो शेअर केले आहेत. या फोटोनंतर तिला चाहते वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा देत आहेत.

प्रेमाची दिली होती कबुली

पोस्टमध्ये हृताने प्रसिद्ध दिग्दर्शक प्रतीक शाहसोबतचे फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये तिने जाहीर केले होते की ती आणि प्रतिक रिलेशनशिपमध्ये आहेत. प्रतिकनेही त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर फोटो पोस्ट करून नात्याची पुष्टी केली होती.

कोण आहे प्रतिक?

प्रतिक हे हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. त्याने यापुर्वी बेहद २, एक दिवाना था आणि तेरी मेरी एक जिंदरी यांसारखे हिट टेलिव्हिजन शो दिग्दर्शित केले आहेत. तो दिग्दर्शक आहे.

हृताच्या पोस्टवर अनेक कलाकार आणि चाहत्यांनी कमेंट करून तिचे अभिनंदन केले आहे. हृताने 'दुर्वा' या टेलिव्हिजन शोमधून पदार्पण केले होते. पुढे 'फुलपाखरू' मालिकेतही काम केले होते. या मालिकेतून तिला लोकप्रियता मिळाली. तिने मास कम्युनिकेशनची पदवी घेतलीय.

सध्या ती मन उडू उडू झालं या मालिकेत काम करत आहे. या मालिकेत ती अजिंक्य राऊतसोबत काम करतेय. या मालिकेने अल्पावधीतचं लोकप्रियता मिळवली. अजिंक्य आणि हृता यांच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर गारूड निर्माण केले आहे. हृता आणि अजिंक्यची जोडी प्रेक्षकांसाठी खूप खास आहे. या शोमध्ये हृताने दीपालीची भूमिका साकारली आहे, जी अतिशय तत्त्वनिष्ठ स्त्री आहे. आयुष्य जगत असताना, तिची भेट इंद्राशी होते, जो तिचे आयुष्य बदलतो,

(Video, photo – hrutaa_ ,hruta12 insta वरून साभार)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT