छत्रपती संभाजीनगर; पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणासाठी मराठवाड्यात पेटलेल्या आंदोलनाची धग मंगळवारी दोन तरुणांचा घास घेऊन गेली. छत्रपती संभाजीनगर आणि गंगाखेड येथील दोन तरुणांनी आपले जीवन संपविले; तर हिंगोली जिल्ह्यातील तरुणाने पेटवून घेतले. यात तो 70 टक्के होरपळला आहे. लातूरच्या औसा तालुक्यातही एका महिलेने टोकाचा निर्णय घेतला. कविता चव्हाण (वय 47, रा. हासेगाव) असे तिचे नाव आहे. (Maratha Reservation)
संबंधीत बातम्या :
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कोलठाण-पोखरी शिवारात शुभम गाडेकर (24) याने मंगळवारी सकाळी 8 वाजता गळफास घेऊन जीवन संपविले.
गंगाखेड (जि. परभणी) तालुक्यातील मैराळसावंगी येथील अशोक जाधव या 30 वर्षीय युवकाने मराठा आरक्षणासाठी जीवनाचा शेवट केला. तो 28 तारखेपासून घरातून बेपत्ता होता. सागर वाळे (25) याने गळफास घेऊन जीवन संपवले. ही घटना संगमनेर तालुक्यातील झोळे गावात मंगळवारी पहाटे घडली आहे. सोलापूर जिल्ह्यातील विलास किसन क्षीरसागर या तरुणाने झाडाला गळफास घेत जीवनयात्रा संपवली. (Maratha Reservation)
हेही वाचा :