पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेत झालेल्या सामुहिक गोळीबारात प्रकल्प अभियंता म्हणून काम करणाऱ्या २७ वर्षीय भारतीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. शनिवारी (दि. ६) टेक्सास भागातील डॅलस येथे एका मॉलमध्ये ही घटना घडली. या गोळीबारात तरुणीसह नऊ जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली.
न्यूयॉर्क पोस्ट या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, मॅककिनी येथे राहणाऱ्या ऐश्वर्या थाटीकोंडा या मुळच्या भारतातील तमिळनाडू या राज्यातील आहेत. त्या त्यांच्या मित्रासोबत डॅलसमधील अॅलन प्रीमियम या मॉलमध्ये खरेदीसाठी गेलेल्या होत्या. यावेळी एका बंदुकधारी मॉरिसियो गार्सियाने नावाच्या व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार सुरु केला. तेथील भारतीय वेळेनुसार शनिवारी (दि. ६) दुपारी साडेतीनच्या सुमारास हा गोळीबार झाला. या गोळीबारात ऐश्वर्या यांच्याव्यतिरिक्त आठ जण ठार झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे.
अचानक झालेल्या गोळीबारामुळे मॉलमध्ये गोंधळ उडाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पोहोचले आणि पोलिसांनी संपूर्ण मॉलला घेराव घातला.हल्लेखोर ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, हल्लेखोराने गोळीबार केल्यानंतर स्वत:वर गोळी झाडली की पोलिसांनी प्रत्युत्तरात (America News) केलेल्या कारवाईत त्याचा मृत्यू झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
हेही वाचा