नागपूर; पुढारी वृत्तसेवा: नागपूर महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, समाजकल्याण विभाग यांच्या समन्वयाने नागपूर मध्ये तृतीयपंथीयांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. याशिवाय येथील व्हेरॉयटी चौकातील लता मंगेशकर हॉस्पिटल परिसरात स्थित सारथी ट्रस्टच्या कार्यालयात तृतीयपंथीयांसाठी लसीकरण सुरु आहे.
खरबी चौकातील बेटियां शक्ती फाऊंडेशन सभागृहामधील लसीकरण केंद्राचा विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., सहायक पोलिस आयुक्त रेखा भवरे, किन्नर समुदायाच्या गुरू कल्याणी नायक यांच्या हस्ते लसीकरणाचा शुभारंभ झाला.
अधिक वाचा
तृतीयपंथीयांच्या हक्काचे संरक्षण व कल्याण या राज्य शासनाच्या योजनेंतर्गत शहरामध्ये तृतीयपंथीयांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी दोन्ही लसीकरण केंद्रांवर प्रत्येकी शंभरच्यावर तृतीयपंथीयांचे लसीकरण करण्यात आले.
अधिक वाचा
याशिवाय व्हेरॉयटी चौकातील लता मंगेशकर हॉस्पिटल परिसरात स्थित सारथी ट्रस्टच्या कार्यालयामध्ये तृतीयपंथीयांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली.
कोरोना विरुद्धच्या लढ्यामध्ये लसीकरण हे एकमेव शस्त्र आहे. लसीकरणाचा प्रभाव आपल्या प्रतिकारशक्तीवर होतो. त्यामुळे प्रत्येकाने लसीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे.
अधिक वाचा
लसीकरण म्हणजे, कोरोनापासून मुक्तता नव्हे. त्यामुळे लसीकरणानंतरही प्रत्येकाने मास्क लावणे, नियमित हात धुणे, गर्दी टाळणे आदी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, असे आवाहन याप्रसंगी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले.
हेही वाचलंत का?
पाहा : "हे विठु राया आता कोरोना संपू दे आणि शाळा सुरु होउदे…"