file photo 
विदर्भ

नागपुरच्या रेड लाईट वस्तीत समर्थक विरोधक आमने सामने; तणावाची परिस्थिती

backup backup

नागपूर पुढारी वृत्तसेवा : नागपूर मधील गंगा जमूना या रेड लाईट वस्तीत समर्थक आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की झाल्याने वातावरण चिघळलं आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून या ठिकाणी पोलिसांचा ताफा दाखल झाला. पोलिस दोन्ही गटाला समजवण्याचा प्रयत्न करत आहेत.

नागपूर मधील पोलिस आयुक्तांनी काही दिवसांपूर्वी अचानक गंगा जमना हा रेड लाईट एरिया सील करून तिथं जमावबंदी लागू केली. तसंच रेड लाईट येथील वारांगनांना तिथून निघून जाण्यास सांगितलं. पोलिसांच्या या कारवाईला आता विरोध सुरू असून, दुसरीकडे या कारवाईचं समर्थनही करण्यात येत आहे. रविवारी सकाळपासूनच समर्थक आणि विरोधक समोरासमोर ठाकल्याने गंगा जमूनातील मासूरकर चौकात प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालं.

दहा दिवसांपूर्वी पोलिसांनी गंगा जमनाला सील ठोकून या ठिकाणी जमावबंदी लागू केली. या कारवाईला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अर्बन सेलच्या अध्यक्षा ज्वाला धोटे यांनी विरोध केला. पोलिसांची ही कारवाई हिटलरशाही असल्याचा आरोप करत रक्षा बंधनापर्यंत या भागातील जमावबंदी न हटवल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. ज्वाला धोटे या समर्थकांसह गंगा जमूनात पोहोचल्या. त्यानंतर काही वेळातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या व नगरसेविका आभा पांडे यांच्यासह परिसरातील नागरिकही गंगा जमनाविरोधात व पोलिस कारवाईच्या समर्थनार्थ मासूरकर चौकात आले.

पोलिस कारवाईचे विरोधक व समर्थक समोरासमोर आले. त्यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. त्यामुळे तणाव निर्माण झाला. माहिती मिळताच पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी दोन्ही गटाला वेगळे केले. ज्वाला धोटे व नगरसेविका आभा पांडे या दोघीही राष्ट्रवादीच्याच नेत्या आहेत. एकाच पक्षात असूनही एक विरोधक व एक समर्थक असे दोन गट रविवारी पाहायला मिळाले. दोन नेत्या समोरासमोर ठाकल्याने राष्ट्रवादीतील नेत्यांमधील 'अंतर' पुन्हा एकदा समोर आल्याची चर्चा परिसरात होती.

हे ही वाचलत का :

काबूल ग्राऊंड रिपोर्ट : तालिबान दहशत अनुभवलेला काबूलचा वालीजान पुढारी ऑनलाईनवर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT