यवतमाळ

यवतमाळ : रेती तस्करांनी केली तलाठ्यासह कोतवालास मारहाण

करण शिंदे

यवतमाळ, पुढारी वृत्तसेवा : दिग्रस तालुक्यातील गांधीनगर फाटा येथे अवैध रेती वाहतूक करणारे वाहन पकडल्याने तस्करांनी तलाठ्यासह कोतवालाला मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (दि.14) घडली. या प्रकरणी दिग्रस पोलिस ठाण्यात तिघाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान मारहाण केलेला व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

यवतमाळ जिल्ह्यात अवैध रेती तस्करी मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. या तस्करांवर अंकुश घालण्यात प्रशासन पुन्हा अपयशी ठरत असल्याचे दिसून आले. प्रशासनातर्फे कारवाईचा आसूड उगारूनही जिल्ह्यातील विविध रेती घाटांवर रेती तस्करी जोमात सुरू असल्याचे दिसून येते. दिग्रस-दारव्हा रोडवरील अरुणावती नदीपात्रातूनही मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा सुरू आहे. ट्रॅक्टर तसेच इतर छोट्या वाहनातून रेतीची वाहतूक केली जाते. तलाठी व कोतवाल यांना यांच प्रकारे एका वाहनातून रेतीची अवैध वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले.

हे वाहन तलाठी आणि कोतवालासने अवैध रेती वाहतुक करणारे वाहन अडविले असता, वाहन चालकांनी तलाठी तसेच कोतवालाला मारहाण केली. यासोबतच दोघांना जीवे मारण्याची धमकीही दिली. याबद्दल तलाठी जयंत प्रकाश व्यवहारे यांनी दिग्रस पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. यावरून पोलिसांनी शेख मतीन शेख मोबीन (वय.50), लकी मतीन शेख (वय.30), गोलू मतीन शेख (वय.23) सर्व रा. आंबेडकरनगर यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT