विद्यार्थ्यांना शाळेतच मिळणार ‘एसटी’चा पास

विद्यार्थ्यांना शाळेतच मिळणार ‘एसटी’चा पास
Published on
Updated on

[author title="प्रा.शाम पाटील" image="http://"][/author]

मुदाळतिट्टा : शाळा-महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना आता एस.टी.चे पास थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना आता एस.टी.चे पास शाळेतच मिळणार असल्यामुळे पास काढायच्या रांगेत दिवसभर उभारायची कटकट मिटणार असून त्यातून त्यांची मुक्तता होणार आहे.

नवीन वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा आता सुरू झालेल्या आहेत. घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून ६६% इतकी सवलत दिली आहे, म्हणजे केवळ ३३% रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक पास काढता येतो. त्याचप्रमाणे शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जाते. पास मिळवण्यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनींना एसटीच्या पास केंद्रावर जाऊन रांगेत उभा राहून पास घ्यावे लागत होते. किंवा गटागटाने आगारात जाऊन आगार व्यवस्थापनकडून पास घ्यावे लागत असे. पण यंदापासून विद्यार्थ्यांना पाससाठी आता रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही. त्यांच्या शाळा -महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार एसटीच्या कर्मचाऱ्याकडून त्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना त्यांचे एसटी पास थेट शाळेत देण्यात येणार आहेत. जेणेकरून त्यांचा वेळ वाया जाणार नाही.

या संदर्भात १८ जुन पासुन एसटी प्रशासनातर्फे " एसटी पास थेट तुमच्या शाळेत " हि विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तत्पूर्वी सर्व शाळा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्य यांना एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी पत्र देऊन आपल्या शाळेत नवीन वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्यास सांगितले आहे. या अभिनव योजनेचा लाभ राज्यभरात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना होणार आहे. विद्यार्थी विद्यार्थिनींना शाळेतच एसटीचा पास मिळणार असल्यामुळे पालक शिक्षक विद्यार्थी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे. 'एसटी' चा विद्यार्थ्यांचा सवलतीचा पास मिळवण्यासाठी दिवसभर पास केंद्रावर ताटकळत उभे राहावे लागत होते, यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाया जात होता. त्या दिवशीचा शिक्षणक्रम त्यांचा चुकत होता. याची दखल घेऊन विद्यार्थ्यांना आता शाळेतच पास देण्यात यावेत, अशा सूचना एस.टी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी स्थानिक एसटी प्रशासनाला दिल्या आहेत.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news