विदर्भ

वाशिम : मालेगाव तालुक्यातील बनावट हॉस्पिटलवर छापा बोगस डॉक्टरला अटक

backup backup

वाशीम, पुढारी वृत्तसेवा : समाजामध्ये वैद्यकीय पेशातील लोकांना देवाच्या बरोबरीचा दर्जा दिला जातो. कारण आजाराने त्रस्त झालेल्या जीवाला डॉक्टरच त्याच्या वैद्यकीय उपचाराने बरे करू शकतात, त्यांच्या वेदना बंद करू शकतात. परंतु, काही लोक मात्र कुठल्याही प्रकारचे वैद्यकीय शिक्षण न घेता स्वतः डॉक्टर असल्याचे भासवतात व रुग्णांवर उपचार करून त्यांच्या जीवाशी खेळतात. या पार्श्वभूमीवर मालेगाव तालुक्यातील ग्राम मारसूळ येथील एका बनावट डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे.

मालेगाव तालुक्यातील मारसूळ या गावात बनावट डॉक्टर असल्याची गुप्त माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक अमर मोहिते यांच्या पथकाने आरोग्य विभागाच्या समन्वयाने दवाखान्यावर छापा टाकला. सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात औषधसाठा व इतर वैद्यकीय वस्तू मिळून आल्या. कोणत्याही प्रकारची वैद्यकीय शिक्षण पदवी व परवाना नसताना सदर व्यक्ती हा स्वतः डॉक्टर असल्याचे भासवून रुग्णांच्या आरोग्याशी खेळत होता.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अमर मोहिते यांच्या पथकाने छापा टाकून ही कारवाई केली. मालेगाव तालुका आरोग्य अधिकारी संतोष प्रल्हादराव बोरसे यांच्या फिर्यादीवरून पो.स्टे.मालेगाव येथे महाराष्ट्र वैद्यकीय अधिनियम १९६१ अन्वये प्रमोद सुभाषराव घुगे (वय ३९ वर्षे, रा.मारसूळ, ता.मालेगाव) या बनावट डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचलंत का?

SCROLL FOR NEXT