विदर्भ

Umarkhed crime : प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच केला पतीचा खून

अनुराधा कोरवी

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा: अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने झोपेत गळा आवळून खून केला. उमरखेड ( Umarkhed crime ) तालुक्यातील सावळेश्वर येथे ही  घटना सोमवारी रात्री घडली. पोलिसांनी पत्नीसह प्रियकरालाही ताब्यात घेतले आहे.

( Umarkhed crime ) मध्ये भीमराव उत्तम काळबांडे असे मृत्यू झालेल्या पतीचे नाव आहे. तर पत्नी उज्वला काळबांडे आणि अनिरुद्ध लक्ष्मण काळबांडे अशी गुन्हात सहभागी असलेल्या आरोपीची नावे आहेत.

भीमराव काळबांडे यांच्या पत्नी उज्वलाचे गावातीलच अनिरुद्ध लक्ष्मण काळबांडे याच्यासोबत गेल्या काही दिवसांपासून अनैतिक संबंध होते. मात्र, या संबंधास भीमरावचा अडथळा येत होता. त्यातून भीमराव आणि उज्वलामध्ये नेहमीच भांडण होत होते. त्यामुळे भीमरावचा काटा काढण्याच्या निर्णय दोघांनीही घेतला होता.

सोमवारी (दि.१८) रोजीच्या मध्यरात्री झोपेत असलेल्या भीमरावचा गळा दाबून खून करण्यात आला. मंगळवारी सकाळी भीमरावच्या पत्नीने आणि प्रियकरांने गावात फिरून भीमरावने गळफास लावून आत्महत्या केल्याचा बनाव केला. मात्र, गावकऱ्यांच्या मनात शंका निर्माण झाली.

पोलीस पाटील अनिल कांबळे यांनी या घटनेबाबत बिटरगाव पोलिसांना माहिती दिली. ठाणेदार प्रताप भोस, पोलीस उपनिरीक्षक कपिल मस्के यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर लगेच सहाय्यक पोलिस अधिक्षक आदित्य मिलखेलकर यांनीही भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या.

घटनास्थळावरील परिस्थितीजन्य पुरावे संशयास्पद आढळल्याने पोलिसांनी पत्नी उज्वला व तिच्या प्रियकराला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. पोलिसी हिसका दाखविताच दोघांनीही गुन्हा कबूल केला.  दोघांवरही बिटरगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोद करण्यात आला आहे.

दोन चिमुकले झाले पोरके

भीमराव आणि उज्वलाला एक लहान मुलगा आणि मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. या घटनेत मुलांचे वडील भीमराव काळबांडे यांचा मृत्यू झाला. तर आई उज्वलाला पोलिसांनी तुरुंगात घातले आहे. यामुळे दोन चिमुकले पोरके झाले आहेत.
हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT