Hemangi Kavi : हेमांगी कवी पुन्हा ट्रोल, दिले सडेतोड उत्तर… | पुढारी

Hemangi Kavi : हेमांगी कवी पुन्हा ट्रोल, दिले सडेतोड उत्तर...

मुंबई; पुढारी ऑनलाईन: गेल्या काही दिवसांपूर्वी ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ ही पोस्ट लिहिल्याने अभिनेत्री हेमांगी कवी  ( Hemangi Kavi ) सोशल मीडियावर खूपच चर्चेत आली होती. सध्या आणखी एका मराठमोळ्या लूकने हेमांगी कवी चर्चेत आली आहे. परंतु, यावेळी तिला पुन्हा एकदा ट्रोलर्सचा सामना करावा लागला आहे.

नुकतेच अभिनेत्री हेमांगी कवीने ( Hemangi Kavi ) दसऱ्याच्या निमित्ताने आपल्या इंन्स्टाग्रामवर मराठमोळ्या लूक शेअर केला. या फोटोत हेमांगीने पोपटी आणि निळ्या रंगाच्या साडी नेसली आहे. याशिवाय हेमांगीने आणखी एका निळ्या रंगाच्या नऊवारी साडीत व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत हेमांगीने मराठी गाण्यावर डान्स केला आहे. दोन्ही फोटोत हेमांगीने केसात गजरा आणि साजेशीर दागिने परिधान केले आहेत.

हेमांगीने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ‘आता असे रेशमी खण क्वचितच मिळतात. वीस वर्षांपूर्वीचा ब्लाउज अजूनही व्यवस्थित बसतो. याचा एक वेगळाच आनंद असतो. हो की नाही?”असे लिहिले आहे.’

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच अनेकांनी कॉमेंन्टस करून प्रतिक्रीया दिल्या आहेत. यात हेमांगीच्या लूकचे काही चाहत्यांकडून भरभरून कौतुक केले आहे. तर काहींना या लूकवरून हेमांगीला ट्रोल केलं आहे.

हेमांगीच्या लुकचे कौतुक करताना युजर्संनी ‘खूप सुंदर दिसतेस. साधेपणातलं तुझं सौंदर्य छानच.’ असे म्हटले आहे. तर काही ट्रोलर्सनी मराठमोळ्या लूकमधील ‘साडीचा पदर नीट घेतला असतास तर अजून खूपच छान दिसली असतेस’ असे म्हटले आहे.

यानंतर मात्र, हेमांगीने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देताना म्हणाली की, धन्यवाद. पदर नीट घेतला असता असे कसे कोणी म्हणू शकते का?. जरा भान ठेवून बोलत जा. याशिवाय तिने मराठमोळ्या संस्कृतीत साडीवर स्लीव्हलेस ब्लाउज कधी होता जरा सांगता का? माझं अज्ञान तेवढचं दूर होईल”. असे प्रतीप्रश्न ट्रोलर्सना विचारला आहे.

या प्रश्नानंतर चाहते खूपच भडकले. चाहत्यांनी तुझ्या लुकचे कौतुक देखील आम्ही करतो. परंतु, काहीवेळा कोणती तरी गोष्ट खटकते ती आम्ही तुम्हाला सांगतो. हे चुकीचे आहे का?. असे विचारले आहे.

‘नऊवारी साडी, नथ, खणाचं ब्लाऊज हे मराठमोळ्या पेहरावाचं प्रतीक आहे. तुम्ही नेसलेली साडी आणि त्यावरील स्लीव्हलेस ब्लाउज हा कुठल्याच पारंपारिक पद्धतीचा पेहराव नाही. आधुनिक साडी असाच पेहराव आहे. एखाद्यावेळी तुझी एखादी गोष्ट नाही आवडली तर खिलाडू वृत्तीने घे. तुला दुखावण्याचा अजिबात हेतू नाही’. असे चाहत्यांनी ट्रोल करताना म्हटले आहे.

यानंतर पुन्हा हेमांगीने चाहत्यांना सडेतोड उत्तर देताना म्हणाली की, ‘बायकाच्या लक्षात जी गोष्ट येत नाही ती चाहत्यांच्या लगेच लक्षात येते. आणि ती गोष्ट ते सांगतात. त्यांच्या बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असू शकतो असे तिने म्हटले आहे.’ याशिवाय हेमांगीने कोजागरी पौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button