विदर्भ

सोलापूरचे पी.शिवशंकर यांची नागपुरात वस्त्रोद्योग संचालकपदी नियुक्ती

backup backup

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारने गुरूवारी (दि.१७) अनेक आयएएस वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. सोलापूरचे मनपा आयुक्त असलेले पी.शिवशंकर नागपुरात वस्त्रोद्योग संचालक म्हणून आले आहेत. ते २०११ बॅचचे कॅडर आहेत.

दरम्यान, नागपुरात वस्त्रोद्योग संचालक असलेल्या २००९ बॅचच्या कॅडर श्रीमती शीतल उगले-तेली यांची सोलापूर महापालिकेत मनपा आयुक्त म्हणून बदली झाली आहे. भाग्यश्री विसपुते २०१७ बॅच बुलढाणा जिल्हा परिषदेतून नागपूर जिल्हा परिषदेत सीईओ म्हणून बदलून आल्या आहेत. या वेळी नागपूर जि.प.चे सीईओ योगेश कुंभेजकर यांचेकडे जिल्हाधिकारी, भंडारा म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT