Innovative Passenger Vehicle : युवकाने बनवली ‘6’ सीटर ‘ई बाईक’; जुगाडावर आनंद महिंद्राही फिदा

Innovative Passenger Vehicle
Innovative Passenger Vehicle
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'जुगाड' ही कमी साहित्यात किंवा एखादी उणीव भरून काढण्यासाठी किंवा तडजोड करण्यासाठी उपयोगात आणली जाणारी भारतीय संकल्पना आहे. ही संकल्पना गरज भागवण्यासाठी निर्माण झाली आहे. भारतात प्रत्येकाने कधी ना कधी आपल्या आयुष्यात कोणता ना कोणता जुगाड हमखास केला असेल. मात्र, काही जुगाड इतके भन्नाट असतात की त्यातून हटके अशी निर्मिती होते. असाच जुगाड लावून एका युवकाने एक अशी गाडी 'इलेक्टिक बायसिकल' या प्रकारत बनवली आहे. ज्याच्यामध्ये एकाच वेळी ६ जण बसू शकतात. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या अनोख्या (Innovative Passenger Vehicle) गाडीवर महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा देखील फिदा झाले आहेत. त्यांना देखील याचे कौतुक केल्यावाचून राहावले नाही. वाचा सविस्तर बातमी.

Innovative Passenger Vehicle : नाविन्यपूर्ण गाडी

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडिओतील मुलाने कमी साहित्यात एक गाडी तयार केली आहे. या गाडीवर दोन-तीन नाही तर 6 जण एकत्र बसू शकतात. हा व्हिडिओ पाहून महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्राही अचंबित झाले आहेत. आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना आनंद महिंद्रा यांनी लिहिले आहे की, "केवळ कमी साहित्यात केलेली ही गाडी जागतिक स्तरावरचा शोध असू शकतो. गरज हीच आविष्काराची जननी असलेल्या गावातील वाहतुकीच्या प्रयोगांनी मी नेहमीच प्रभावित असतो."

आनंद महिंद्रा अनेक वेळा आपल्या ट्विटर हँडलवर अशा नवनवीन संकल्पना असलेल्या लोकांना ट्विटरवरून प्रोत्साहित करतात. यापूर्वी देखील अवघ्या सव्वा लाखात रिक्षेत घर बनवणा-या चेन्नईतील तरुणाला प्रोत्साहित केले होते.

Innovative Passenger Vehicle : लोकांची पसंती

व्हिडिओमधील त्या मुलाने दावा केला आहे की, या इलेक्ट्रिक वाहनाची किंमत 10 ते 12 हजार रुपये आहे. त्या व्यक्तीने व्हिडिओमध्ये पुढे सांगितले की, एकदा चार्ज केल्यानंतर हे वाहन 150 किमीपर्यंत धावू शकते. यासोबतच इलेक्ट्रिक सायकल अवघ्या 10 रुपयांमध्ये चार्ज करता येईल. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ड्रायव्हरच्या सीटशिवाय या इलेक्ट्रिक वाहनात आणखी पाच सीट आहेत, म्हणजेच ही बाईक संपूर्ण सहा सीटर आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओला यूजर्स पसंती देत ​​आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत 970.5K व्ह्यूज मिळाले आहेत, तर 49.3K लोकांनी हा व्हिडिओ लाईक केले आहेत.

ग्रामीण भागात महिलांसाठी पाणी आणण्यासाठी उपयोग 

व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरनं म्हटलं आहे की, 'प्राणीसंग्रहालय, पार्क, कॉर्पोरेट कॉम्प्लेक्स यासारख्या ठिकाणांसाठी ही चांगली कल्पना आहे, सामान्य रहदारीसाठी योग्य नाही.' दुसऱ्या युजरने लिहिले की, 'मी अशा छोट्या इंजिनिअरिंगचा चाहता आहे.' तिसऱ्या यूजरने लिहिले की, 'ग्रामीण भागातील महिलांसाठी हा एक अद्भुत शोध आहे. जिथे त्या पाण्यासाठी खूप लांब प्रवास करतात.'

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news