विदर्भ

वाशीम : तृतीयपंथी करीना उतरली ग्रा. पं. निवडणुकीच्‍या रणधुमाळीत

अनुराधा कोरवी

वाशीम; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या खापरदरी येथील तृतीयपंथी ज्ञानेश्वर बळीराम आडे उर्फ करीना यांनी रीतसर ग्रामपंचायत सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे मानोरा तालुकासह जिल्हा वासियांच्या भुवया उंचावल्या आहे.

भारतीय लोकशाहीने देशातील महिला आणि पुरुष नागरिकांना मतदान करण्याचा आणि निवडणूक प्रक्रियेत उमेदवार म्हणून उभे राहण्याचा अधिकार प्रदान केलेला आहे. तृतीयपंथी नागरिकांनाही आता लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून उभे राहून नागरिकांच्या सेवा करण्याची संधी आपल्या देशामध्ये उपलब्ध झाली आहे. ज्याचा प्रत्यय मानोरा तालुक्यामध्ये होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत येत आहे.

दुर्बल घटकांच्‍या विकासाला प्राधान्य देणार

ज्ञानेश्वर बळीराम आडे उर्फ करीना या खापरदरी येथील मूळ नागरिक असून तृतीयपंथी असल्याने ते राज्यातील महानगरांमध्ये सामाजिक आणि इतर सेवाकार्य मागील काही वर्षांपासून करीत आहे.पल्या मूळ गावाशी आणि समाजाशी काहीतरी उत्तरदायित्व असल्यामुळे लोकशाही पद्धतीने निवडणुकीला उभे राहून वंचित आणि दुर्बल घटकांच्‍या विकासाला आपण प्राधान्य देणार असल्याचे मत ज्ञानेश्वर बळीराम आडे उर्फ करीना यांनी व्यक्त केले.

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT