विदर्भ

मविआमध्ये फूट पाडण्याचे काम सरकार करतेय : पृथ्वीराज चव्हाण

अनुराधा कोरवी

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडीमध्ये भगदाड, फूट पाडण्याचे काम केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार करीत आहे. विरोधकांमध्ये एकमत नाही हे दाखवण्याचे काम शिंदे- फडणवीस सरकार करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. मविआच्या वज्रमुठ सभेच्या निमित्ताने आले असता ते बोलत होते.

अजित पवार आणि अमित शहा भेटले का?, याबाबतीत स्पष्टता व्हावी, संभ्रम नको, केवळ तर्क-वितर्क लावण्याला अर्थ नाही. महाविकास आघाडीमध्ये फूट पाडण्याचे काम केंद्र आणि राज्यातील सरकार करीत आहे. पण त्याला यश येईल असं वाटत नाही. कारण महाराष्ट्राची जनता सर्व जाणते. असे ते म्हणाले.

[web_stories title="true" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="DESC" orderby="post_date" view="circles" /]

काँग्रेसने आपली भूमिका वेळोवेळी स्पष्ट केली आहे. सैनिकांचे मनोबल खचेल असे प्रश्न विचारू नका. देशात सरकारविरोधात वातावरण तापले असल्याने खोट्या बातम्या पुरविल्या जात असल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT