[web_stories title="true" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="DESC" orderby="post_date" view="circles" /]
पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशमधील कुख्यात गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद या दोघांची शनिवारी रात्री उशिरा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पोलीस दोघांना प्रयागराज येथील कोल्विन रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी घेऊन जात असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर अंदाधूंद गोळीबार केला. या घटनेने उत्तर प्रदेशमध्ये खळबळ माजली आहे. संपूर्ण राज्यात हाय अर्लट जारी करण्यात आला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दर दोन तासांची अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दफनविधी पार पडणार आहे. या प्रकरणी आतापर्यंत झालेल्या सहा खुलाशांबाबत जाणून घेवूया…
लवलेश तिवारी, शनी आणि अरुण मौर्य अशी आतिक आणि अश्रफ यांची हत्या करणाऱ्या हल्लेखोरांची नावे आहेत. तिन्ही दुचाकीस्वार पत्रकारांच्या वेषात आले होते. तिघेही प्रयागराज येथील एका हॉटेलमध्ये ४८ तास खोली घेऊन थांबल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
अतिक आणि अश्रफ यांची हत्या करणारे तीन हल्लेखोर वेगवेगळ्या जिल्ह्यातून आले होते. पोलिस तपासातील माहितीनुसार , लवलेश तिवारी हा बांदा येथील रहिवासी आहे, अरुण मौर्य हा हमीरपूर तर सनी कासगंजचा रहिवासी आहे. आरोपी सनी सिंग याला एका गुन्ह्यात अटक झाली होती. तुरुंगातच तो भाटी टोळीचा प्रमुख सुंदर भाटीचा खास बनला होता. त्याच्यावर सुंदर भाटीसाठी काम केल्याचा आरोपही आहे.
आतिक आणि अश्रफ यांची हत्या करणाऱ्या तिन्ही हल्लेखोर हे सराईत गुन्हेगार असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. गोळ्या झाडल्यानंतर तिघांनाही पोलिसांनी पकडले. अतिक आणि अश्रफ यांना मारून तिघांना गुन्हेगारी क्षेत्रात माफिया बनायचे होते, असे तिघांनी पोलिसांना सांगितले. शूटर अरुण याच्यावर आधीच खुनाचा गुन्हा दाखल आहे. सनी याच्यावर तब्बल १५ गुन्हे दाखल आहेत. लवलेशवरही एका प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची नोंद आहे.
हल्लेखोर कोणत्या दुचाकीवरून आले होते, याचाही खुलासा झाला आहे. UP70M7337 क्रमांकाची ही दुचाकी सरदार अब्दुल मन्नान खान यांच्या नावाने नोंदणीकृत असल्याची माहिती मिळाली आहे. ही दुचाकी ३ जुलै १९९८ रोजी रोख रक्कम देऊन खरेदी केल्याची नोंद आहे. ही दुचाकी कोठून आणली आणि मारेकऱ्यांना कोणी दिली, याचाही तपास सुरू आहे.
अतिक आणि अशरफ यांची हत्या करणाऱ्या तीन आरोपींना आधीच त्यांच्या घरातून बाहेर काढण्यात आले आहे. त्यांचा मारेकऱ्यांशी कोणताही संबंध नसल्याचा खुलासा तिन्ही मारेकर्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या चौकशीत तिघांनीही आपल्याला मोठे माफिया बनायचे असल्याचे सांगितले आहे. त्यामुळेच त्याने ही घटना घडवली. तिन्ही मारेकऱ्यांनी विचारले की, ते किती दिवस किरकोळ शुटर राहायचे, या विचारातून अतिक आणि अश्रफ यांची हत्या करुन आपलं गुन्हेगारी जगतामध्ये मोठे नाव करण्यासाठी त्यांनी दोघांची हत्या केल्याची कबुली दिली आहे.