नागपूर; पुढारी वृत्तसेवा: राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात ( Nagpur Corona ) मध्यंतरी मंदावलेली कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची वाढ पुन्हा एकदा दिसू लागली आहे.
नागपूरात ( Nagpur Corona ) मागील २४ तासांमध्ये १९ नवे कोरोनाचे रूग्ण आढळले. कोरोना बाधितांपैकी १२ जण एकाच कुटुंबातील असल्याचे समोर आले आहे. या कुटुंबातील २० सदस्य मुलाच्या लग्नासाठी काही दिवसांपूर्वी हैदराबादला गेले होते. तिथून परतल्यानंतर हैद्राबादला गेलेल्या २० जणांपैकी १२ जणांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसून आली. कोरोनाची तपासणी केल्यानंतर यातील १२ जण कोरोना बाधित आढळले.
सध्या सर्वांची प्रकृती बरी असून तीव्र लक्षणे कोणालाच नाही. या सर्वांना सौम्य लक्षणे असल्याचे समजले आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून सर्वांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे सर्वजण ज्या लग्न सोहळ्यात सहभागी झाले होते. तेथील वर आणि वधूचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यांना सावधगिरी म्हणून गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
नागपुरात आढळलेल्या १२ जणांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध आरोग्य प्रशासनाने सुरू केला आहे. या १२ जणांच्या संपर्कात आलेल्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. त्यामुळे रूग्णवाढीचा धोका संभवण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तविण्यात आली आहे.
हेही वाचलंत का?