विदर्भ

बुद्ध पौर्णिमेला ताडोबात पर्यटक घेणार वन्यजिवांबाबत निसर्गानुभव !

अविनाश सुतार

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : सोमवारी (16 मे) बुध्द पौर्णिमेचा दिवस असल्याने अनेक वर्षाच्या परंपरेनुसार ताडोबात सकाळी दहापासून पर्यटकांना वन्यजीवांबाबत निसर्गानुभव पहायला मिळणार आहे. ताडोबाच्या बफरझोनमध्ये होणाऱ्या निसर्गानुभवाची ऑनलाईन बुकींग फुल्ल झाली असून, चोवीस तासाच्या निसर्गानुभवात दिवस आणि चांदण्यारात्रीही पर्यटकांना वाघांपासून विविध वन्यजिवांच्या दर्शनाचा आंनद लुटता येणार आहे.

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात येणारे पर्यटक वाघांच्या दर्शनासोबत विविध वन्यजिवांचे दर्शन घेऊन पर्यटनांचा मनमुराद आनंद लुटतात. याच कारणामुळे दिवसेंदिवस पर्यटकांची ताडेबात गर्दी वाढत आहे. १६ मे हा बुध्द पौर्णिमेचा दिवस असल्याने ताडोबातील बफर झोनमध्ये पर्यटकांकरिता निसर्गानुभव अनुभवाला मिळणार आहे. याकरीता ताडोबा व्याघ्र प्रकल्पाने तयारी पूर्ण केली आहे. कोअरझोनमध्ये वन्यप्राण्याच्या हिताच्या दृष्टीने पर्यटकांची गर्दी करणे योग्य नसल्याने या ठिकाणी निसर्गानुभव करता येणार नाही, असे ताडोबा व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्र संचालकन डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी सांगितले आहे.

बफर आणि कोअर झोनमध्ये नियमित मचानी अस्तित्वात आहेत. विशेष म्हणजे या मचानी पाणवटे असलेल्या ठिकाणाजवळ आहेत. ताडोबात बोअरवेल, सौरउर्जेतवर बोअरवेल शिवाय नैसर्गित पानवटे शुध्दा आहेत. त्या ठिकाणी वन्यप्राणी पाणी पिण्यासाठी येतात. त्यामुळे लगतच्या मचानीवरून त्यांचे दर्शन पर्यटकांना घेणे सुलभ होते. शिवाय मे महिन्‍यात पाणवट्यावर वन्यजीव पाणी पिण्यासाठी नियमित येत असतात. त्यामुळे वन्यजिवांचे दर्शन होतेच.

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात व्याघ्र दर्शन करायचे असेत तर ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे अधिकृत संकेतस्थळ कार्यान्वित आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी पर्यटकांना फेक संकेतस्थळापासून सावधान होण्याचे आवाहन केले आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे www.mytadoba.org याच संकेतस्थळावर पर्यटनासाठी ऑनलाईन बुकींग करावे. फेक संकेतस्थळावर बुकींग न करता सावधान राहावे असे आवाहन डॉ. रामगावरक यांनी केले आहे.

निसर्गानुभव म्हणजे प्राणी प्रगणना नव्हे तर वन्यजिवांचे दर्शन घेण्याचा एक अनुभव आहे. सध्या आधुनिक तंत्रज्ञानाची प्रगती झाल्याने ताडोबातील व्याघ्र प्रकल्पात त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. पर्यटकांना उपलब्ध होणाऱ्या गाईड कडून येथील वन्यजिवांबाबत विस्तृत माहिती उपलब्ध होणार आहे. ताडोबात वन्यजिवांच्या दर्शनाचा निसर्गानुभव हा फक्त विशिष्ठ काळापूरता नाही तर वर्षभरही सुरू असतो. पर्यटक या ठिकाणी येऊन वन्यजिवांच्या दर्शनाचा दिवस व रात्री आनंद लुटतात.

डॉ. रामगावरक

हेही वाचा….

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT