घोषणांची अतिवृष्टी झाली मात्र...
आसन व्यवस्था महत्वाची नाही तर...
आम्ही आमची कर्तव्ये पार पाडतोय
Satej Patil On Farmer: काँग्रेसचे विधन परिषदेतील नेते सतेज पाटील यांनी आज मुख्यमंत्री सहाय्यता निधी, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठीचे मदतीचे पॅकेज यावरून टीका केली. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनासंदर्भात ते बोलते होते. त्यांनी शेतकऱ्यांना अजून मदत पोहचली नसल्याकडे लक्ष वेधले. सतेज पाटील यांनी घोषणांची अतिवृष्टी झाली मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांसाठी पॅकेज मिळालेले नाही असं वक्तव्य केलं.
सतेज पाटील पत्रकारांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणाले, 'मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये शेतकऱ्यांसाठी म्हणून निधी गोळा केला असेल तर तो त्यांच्यासाठीच खर्च झाला पाहिजे. नंतर तांत्रिक कारणासाठी निधी देता येत नाही असं बोलणे संयुक्तिक नाही. हा निधी खर्च करता येतो. मात्र सरकारची ती भूमिका दिसत नाही. अजून पॅकेज पोहोचलं नाही. घोषणांची अतिवृष्टी झाली पण शेतकऱ्यांना पॅकेज मिळालेले नाही.'
शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत बोलताना सतेज पाटील यांनी आम्ही यावर पुरणवी मागण्यांमध्ये बोलणार असल्याचं सांगितलं.
काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी आसन व्यवस्थेवरून ठाकरे गट अन् काँग्रेस यांच्यातील वादाबाबतही भाष्य केलं. त्यांनी आसन व्यवस्था हा महत्वाचा मुद्दा नाही तर बेरोजगारी हा आमच्यासाठी ज्वलंत विषय आहे.'
त्याचबरोबर सतेज पाटील यांनी सध्या विधानसभेच्या अधिवेशनात गाजत असलेल्या विरोधी पक्षनेते पदाच्या प्रश्नाबाबत बोलताना वक्तव्य केलं. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात यावरून वाद असल्याबाबत विचारल्यावर ते म्हणाले की, 'आमच्यात कुठलाही वादाचा प्रकार नाही. या फक्त बातम्या आहेत. यशवंतराव चव्हाण यांनी लोकशाही टिकवली. संविधानिक पदे भरली जावी. विरोधी पक्षनेतेपद निवडीसाठी तांत्रिक अट नाही हे विधीमंडळाने सांगितले आहे. तसेही पद नसले तरी आम्ही बोलतोयच.'
विरोधी पक्ष विधीमंडळात भूमिका मांडण्यात कमी पडतोय का यावर देखील सतेज पाटील यांनी आपलं मत व्यक्त केलं. त्यांनी आम्ही ताकदीनं सभागृहात मुद्दे मांडतोय. पायऱ्यांवर आंदोलन करतोय. ही एक प्रथा आहे. आम्ही कायदेमंडळात भूमिका मांडण्याची जबाबदारी पार पाडतोय.
दरम्यान आमदारांची कमी संख्या याबाबत सतेज पाटील यांनी नगरपंचायत व नगरपालिका निवडणुकांमुळे आमदार अनुपस्थितीत आहेत असं सांगितलं.