नागपूर

Nagpur News : ढगफुटी, भूगर्भातील माहितीसाठी सॅटेलाईट लाँच करणार : अनिल पाटील

दिनेश चोरगे

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यात यावर्षी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नागपुरात गेल्या शनिवारी ढग फुटी सदृश पाऊस झाल्याने कोटयवधी रुपयांची हानी झाली. सामान्य जनता आणि विरोधक याबाबतीत संतप्त झाल्यानंतर यासंदर्भात आता राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे.

लवकरच मदत आणि पुनर्वसन विभागाकडून एक सॅटेलाईट लाँच करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ज्याद्वारे ढगफुटी, वादळ, अतिवृष्टी, भूगर्भातील हालचाली याची माहिती मिळणार असून यासाठी आमचा विभाग एक ॲडव्हान्स पाऊल उचलणार आहे. देशातला हा पहिला प्रयोग असणार आहे, अशी माहिती मदत व पुनवर्सन मंत्री अनिल पाटील यांनी दिली.

एकीकडे शहरं सुंदर हवे. पण भविष्याचा विचार करुनच यापुढे विकासांचा प्लॅन करावा लागेल, या वास्तवाकडे त्यांनी लक्ष वेधले. दरम्यान, विरोधकांनी पंचनामे व मदतीत भेदभाव होत असल्याचा, अलर्ट न मिळाल्याचा आरोप केला होता. याबाबतीत छेडले असता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून माहिती घेईल की, नुकसान किती झालं. कुठल्याही नागपूरकरांचं नुकसान होऊ देणार नाही असा विश्वास अनिल पाटील यांनी माध्यमांजवळ बोलून दाखविला.

नागपुरात शनिवारी जवळपास ढगफुटी झाली, यासंदर्भात नुकसान भरपाईसाठी मदत व पुनर्वसन खात्याकडून काय मदत केली जाऊ शकते याचा आढावा आज मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी घेतला. नागपुरात विविध पूरग्रस्त भागाची पाहणी केली.
मदत पुनर्वसन विभागाला केंद्र सरकारकडून मदत लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जवळपास १० किमी नाग नदीवरील सुरक्षा भिंत तुटली आहे. यासाठी राज्य सरकरकडून तात्काळ मदत मिळेल. डिसेंबरच्या अधिवेशनात ग्रामीण भाग आणि शहरासाठी नागपूर जिल्ह्यासाठी एकत्र पॅकेज जाहीर करण्याचे नियोजन आहे.

एकंदर १२५०० हजार लोकांचे नुकसान झाल आहे. त्यांचे पंचनामे झाले. पंचनामे २ तारखेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश आहेत. तीन तारखेपासून १० हजार रुपयांच्या मदतीचे वाटप केले जाणार आहे. मात्र, मदतीसाठी कुणीही दलालांच्या भूलथापांना बळी पडू नका, पैसे मागणाऱ्या दलालांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. श्रीमंत व्यक्तींना १० हजार मदत कमीच आहे. पण पंचनामे झाल्यास त्यांचा डेटा सरकरकडे राहील.

नाग नदीवर अंबाझरी तलावापासून १० किमी पर्यंत पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होईल असे पूल किंवा इतर बांधकाम तोडणे गरजेचं आहे. याबाबतीत मनपा १० दिवसांत रिपोर्ट सादर करणार असून संरक्षण भिंत बांधण्याबाबत कार्यवाही केली जाईल. दरम्यान, मदत व पुनर्वसन विभाग आणि सिंचन विभागाकडून अंबाझरी तलावाचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना केली आहे. मदतीसाठी देखील मला फडणवीस यांनी सुचना दिल्या आहेत. नागपूरसाठी खास पॅकेज कसं तयार करायचं? यासाठी मी आलो आहे. नागपुरात १०९ मिमी पाऊस झाला म्हणून नुकसान झालं असं म्हणण्याचं कारण नाही.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT