नाशिककरांचा लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप, पाहा क्षणचित्रे | पुढारी

नाशिककरांचा लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप, पाहा क्षणचित्रे

नाशिक :  पुढारी वृत्तसेवा

एक, दोन, तीन चार गणपतीचा जयजयकार करत नाशिककरांनी गुरूवारी (दि.२८) लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. भक्तांनी साश्रुनयनांनी गणरायाला निरोप देतानाच गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असे आर्जव केले.
घरोघरी दहा दिवसांच्या पाहुणचार घेतल्यानंतर गणराय त्यांच्या गावाला परत गेले. यावेळी लाडक्या बाप्पाला निरोप देताना नाशिककरांचा कंठ दाटून आला.
शहरातील द्वारका येथील वाकडी बारव येथे दुपारी १२ वाजता पालकंमत्री दादा भुसे यांच्याहस्ते मानाच्या गणेशाचे पुजन करून विसर्जन मिरवणूकीला प्रारंभ करण्यात आला.
ना. भुसे यांनी ढोल वादनाचा आनंद लुटताना टाळ-मृदुंगाच्या तालावर फेर धरला.
तत्पूर्वी सकाळपासून घरोघरी तसेच छोट्या-मोठ्या सार्वजनिक मंडळांच्या गणेशमुर्तींचा विसर्जन सोहळा पार पडला. पंचवटीमधील रामकुंड, गोदाघाट परिसर, तपोवन परिसर, नवश्या गणपती, घारपुरे घाट आदी ठिकाणी विसर्जनासाठी गर्दी झाली.
सायंकाळनंतर नाशिककर सहकुटूंब मिरवणूक पाहण्यासाठी घराबाहेर पडले. पारंपारिक मार्गावरून ही विसर्जन मिरवणूक जशी-जशी पुढे सरकत होती, तसा नागरिकांचा उत्साह शिगेला पाेहचला.

(सर्व छायाचित्रे : हेमंत घोरपडे)

यंदाच्या वर्षी मिरवणूकीत विविध मंडळांमध्ये डीजेचा दणदणाट पाहायला मिळाला

Back to top button