नागपूर; पुढारी वृत्तसेवा : जैन तीर्थस्थळांना जोडणारा जैन सर्किट योजना हा महत्वाकांक्षी प्रकल्प कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने गतीने पावले उचलली जात असल्याची ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. महावीर युथ क्लबच्या 'महावीर तिथी दर्पण' आणि अखिल दिगंबर जैन सैतवाल संस्थेच्या 'आर्यनंदी दिनदर्शिके'चे प्रकाशन नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
महाराष्ट्र तसेच देशांतील महत्त्वाच्या जैन तीर्थक्षेत्रांना लाखो जैन भाविक भेटी देतात. यामध्ये महिला आणि वृद्धांची संख्या अधिक असते. त्यांच्या तीर्थयात्रा अधिक सुकर आणि सहज व्हाव्यात, आबालावृद्धांना तीर्थयात्रा किमान श्रम आणि किमान खर्चात करता याव्यात, या दृष्टीने जैन सर्किट योजना राबविण्याची विनंती अखिल दिगंबर जैन सैतवाल संस्थेतर्फे करण्यात आली होती, देशभरातील जैन तीर्थक्षेत्र महामार्गाने एकत्र जोडणाऱ्या या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी लवकरच आराखडा तयार करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येईल, असेही गडकरी यांनी सागितले.
प्रारंभी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे स्वागत राष्ट्रीय महामंत्री नितीन नखाते, प्रशांत मानेकर, मंगेश बिबे, मनुकांत गडेकर, बाहुबली पळसापुरे, श्रीकांत तुपकर आदींनी शाल आणि स्मृतीचिन्ह देऊन स्वागत केले. याप्रसंगी माहिती व जनसंपर्क विभागाचे माध्यम समन्वयक अनिल गडेकर, महामंत्री दिलीप राखे, समाजसेवी डॉ. रवींद्र भुसारी, क्लबचे सदस्य प्रशांत भुसारी, अविनाश शहाकार, प्रदीप तुपकर, मनोज गिल्लरकर हे प्रामुख्याने उपस्थित होते.
हेही वाचा :