नागपूर

नागपूर : क्रिकेट मॅचवर जुगार, ११ लाखांच्या मुद्देमालासह तीन आरोपींना अटक

अविनाश सुतार

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : सध्या क्रिकेटचा विश्वचषक सुरू आहे. क्रिकेट सट्टेबाजांसाठी ही पर्वणीच आहे. गुन्हे शाखा युनिट क्र. ५ च्या पोलिसांनी क्रिकेट मॅचवर जुगार खेळणाऱ्या तीन आरोपींना अटक केली़ आरोपींच्या ताब्यातून ११ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिस ठाणे सोनेगाव हद्दीत रूम नं १०६, चौथा माळा, ऐलीटा रूम अ‍ॅण्ड सर्विस अपार्टमेंट, मनीषनगर, सोनेगाव येथे छापा टाकला़ येथे अभिषेक राजेंद्र भोपचे (वय ३०, रा. वॉर्ड नं. ३३, हरीओमनगर, गायखुरी रोड, बालाघाट), सुनील ईश्वरलाल किरतानी (वय ३७ रा. वॉर्ड नं. २२, सोगापथ, बालाघाट) हे त्याचा साथीदार प्रांजल जैन (रा. नॉव्हेल्टी मार्केट, बालाघाट, मध्यप्रदेश) याच्या मदतीने श्रीलंकाविरुद्ध अफगानिस्तान दरम्यान खेळल्या गेलेल्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यावर टीव्हीवर बसून मोबाईल फोनवरून खायवाडी, जुगार खेळताना आढळले.

आरोपींच्या ताब्यातून चार मोबाईल फोन, दोन आय फोन, पॉवरबँक, चार्जर, सेटटॉप बॉक्स, आकडेवारी नोंदी, तसेच एक रेनॉल्ड डस्टर कार व इतर साहित्य असा एकूण ११ लाख ७५ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस उप आयुक्त (डिटेक्शन) गुन्हे शाखा, सहा पोलिस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि राहुल शिरे, सपोनि थारकर, पोउपनि राहुल रोटे पोहवा राजूसिंग राठोड, बाबल यांनी ही कारवाई केली़

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT