Drowning  Pudhari
नागपूर

Nagpur Drown death: वाघापासून बचावले पण बंधाऱ्यात बुडाले; बापलेकाच्या मृत्यूने महाराष्ट्र हळहळला

Deolapar forest zone: वाघ हल्ला करेल या भीतीने जीवन यांनी जतीनसह बचावासाठी बंधाऱ्यात उडी घेतली

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : वाघापासून बचावले पण पळताना जीव वाचविण्यासाठी बंधाऱ्यात उडी घेणाऱ्या बापलेकाचा मृत्यू झाला. ही घटना देवलापार वन परिक्षेत्रातील छाबारी गावालगतच्या लखन बंधारा येथे घडली. जीवन धर्मराज कोकोडे (वय ३५) व त्यांचा मुलगा जतिन (वय ७ दोन्ही रा. दुलाय), अशी मृतकांची नावे आहेत.

रविवारी (दि.१२) सकाळी जीवन, त्यांचा मुलगा जतीन व मेहुणा लखन बंधाऱ्यावर मासेमारीसाठी गेले. यादरम्यान लखनला वाघ येताना दिसला. त्याने आरडाओरड करीत जीवन यांना सतर्क केले. वाघ हल्ला करेल या भीतीने जीवन यांनी जतीनसह बचावासाठी बंधाऱ्यात उडी घेतली.

मात्र, चिखलात पाय अडकल्याने बाप लेक बंधाऱ्यात बुडाले. आरडाओरड करीत मेहून्याने गावाकडे धाव घेतली, गावकरी आले. जतिन तरंगताना दिसला, नंतर पोलिसांनी जीवन यांचाही मृतदेह बाहेर काढला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT