विदर्भ

नागपूर : नागनदी प्रकल्पाबाबत सुधारित डीपीआर तयार करण्याचे नितीन गडकरींचे आदेश

backup backup

नागपूर, पुढारी वृत्तसेवा नागपूरच्या नागनदी पुनरुज्जीवन प्रकल्पाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, जलशक्ती मंत्रालयाचे सचिव पंकज कुमार, नागपूर महानगरपालिका आयुक्त बी. राधाकृष्णन आणि जायकाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. याबाबत तातडीने कन्सल्टंट नियुक्त करून सुधारित डीपीआर तयार करण्याचे आणि कामाची गती वाढवण्याचे निर्देश केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत.

नागनदीच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाला केंद्रीय कॅबिनेटच्या मंजुरीनंतर कॅबिनेटच्या खर्च व वित्त समितीने (ईएफसी) यापूर्वीच मंजुरी दिली आहे. याद्वारे प्रकल्पाच्या २ हजार ११७ कोटींच्या कामांना सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नागनदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या पूर्णत्वास आठ वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला असून याअंतर्गत ९२ एमएलडी क्षमतेचे तीन एसटीपी प्रकल्प, ५०० किमी सीवरेज नेटवर्क, पंपीकरण स्टेशन कम्युनिटी टॅायलेट निर्माण केले जाणार आहेत.

नागनदीच्या प्रवाह क्षेत्रातील भूजल पातळी वाढविण्यात आल्यास नदी पुनरुज्जीवित होईल, असा निष्कर्ष नागपुरातील विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेने केलेल्या संशोधनात काढण्यात आला होता. नागपूरची ओळख असलेल्या नागनदीतील प्रदूषण कमी करणाऱ्या २११७.५४ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला यापूर्वीच मंजुरी मिळाल्यामुळे नागनदीची जैवविविधता संवर्धन होऊन पुनरुज्जीवन शक्य होणार आहे.

हेही वाचलतं का?

SCROLL FOR NEXT