भंडारा: पुढारी वृत्तसेवा : नुकत्याच झालेल्या कोतवाल भरतीचा पेपर परीक्षार्थ्यांनी फोडल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी उमेदवारासह चार जणांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
भंडारा तालुक्यातील कोतवाल पदभरती प्रक्रियेसाठी २८ मेरोजी येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयात लेखी परीक्षा घेण्यात आली. परीक्षा सुरू असताना जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपीक निमेश गेडाम यांच्या भ्रमणध्वनीवर कोतवाल परिक्षेच्या प्रश्नांचे उत्तरांचे स्क्रिन शॉट प्राप्त झाले. त्यानंतर भंडाराचे तहसीलदार तथा कोतवाल भरती परीक्षेचे सदस्य अरविंद हिंगे यांनी गोपनिय माहिती काढण्यास सुरुवात केली. तेव्हा परीक्षा देणारा उमेदवार चेतन ज्ञानेश्वर बावनकुळे (वय १९, रा. परसोडी, जवाहरनगर), त्याचा चुलतभाऊ राहुल बावनकुळे, सुनील घरडे (अर्जनविस) आणि अरविंद धारगावे (रा. बेला) व त्यांच्या साथीदारांनी परीक्षेतील प्रश्नांची उत्तरे उघड करुन कॉपी केली. आरोपींनी शासकीय नोकरी मिळविण्याकरीता परीक्षेच्या उमेदवारांची व शासनाची फसवणूक केल्याने त्यांच्याविरुद्ध भंडारा पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
हेही वाचा