भंडारा : चप्राड ग्रा.पं.मध्ये ६८ लाखांची अफरातफर; माजी सरपंचासह २ ग्रामविकास अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे | पुढारी

भंडारा : चप्राड ग्रा.पं.मध्ये ६८ लाखांची अफरातफर; माजी सरपंचासह २ ग्रामविकास अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे

भंडारा: पुढारी वृत्तसेवा: बोगस बिले जोडून साहित्य खरेदी केल्याचे दाखवून तब्बल ६८ लाख ९६ हजार रुपयांची अफरातफर केली. या प्रकरणी माजी सरपंचासह तत्कालीन दोन ग्रामविकास अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. लाखांदूर तालुक्यातील चप्राड ग्रामपंचायतीमध्ये सन २०१३ ते २०१९ या कालावधीत हा प्रकार घडला.

धनराज गोपीनाथ ढोरे (वय ४७, रा. चप्राड) असे तत्कालीन माजी सरपंचाचे नाव आहे. तसेच गोपालकृष्ण परसराम लोखंडे (वय ५०), विलास पंडीतराव मुंढे (वय ४४) अशी तत्कालिन ग्रामविकास अधिकाऱ्यांची नावे आहेत.

चप्राड ग्रामपंचायतीमध्ये सन २०१३ ते २०१९ या कालावधीत धनराज ढोरे याने तत्कालिन ग्रामविकास अधिकाऱ्याच्या संगनमताने बनावट बिले तयार करुन साहित्य खरेदी केल्याचे दाखविले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली असता ६८ लाख ९६ हजार ३२४ रुपयांच्या शासकीय रकमेची अफरातफर झाल्याचे स्पष्ट झाले. यावरुन लाखांदूरचे गटविकास अधिकारी मार्तंड खुणे यांच्या तक्रारीवरुन लाखांदूर पोलीस ठाण्यात धनराज ढोरे, गोपालकृष्ण लोखंडे, विलास मुंडे यांच्यासह एका महिलेविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

हेही वाचा 

Back to top button